महाराष्ट्रात मोदींच्या आठ प्रचारसभा, मुंबईत उद्धव ठाकरेंसोबत येणार एकाच व्यासपीठावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 09:53 AM2019-03-28T09:53:02+5:302019-03-28T09:54:16+5:30

युतीची घोषणा करून जागावाटपाचे समीकरण जुळवल्यानंतर आता शिवसेना आणि भाजपाने प्रचारात आघाडी घेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

Narendra Modi's eight rally in Maharashtra | महाराष्ट्रात मोदींच्या आठ प्रचारसभा, मुंबईत उद्धव ठाकरेंसोबत येणार एकाच व्यासपीठावर

महाराष्ट्रात मोदींच्या आठ प्रचारसभा, मुंबईत उद्धव ठाकरेंसोबत येणार एकाच व्यासपीठावर

Next

मुंबई - युतीची घोषणा करून जागावाटपाचे समीकरण जुळवल्यानंतर आता शिवसेना आणि भाजपाने प्रचारात आघाडी घेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युतीकडून प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही राज्यात आठ प्रचारसभा होणार आहेत. तसेच मुंबईत होणाऱ्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी युती तुटल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये बेबनाव निर्माण झाला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीकेच्या फैरी झडत होत्या. दरम्यान, लोकसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी असतानाच दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा युतीची गोळाबेरीज जमवली. तसेच अपवाद वगळता दोन्ही पक्षांचे जागावाटपही सुरळीतपणे पार पडले आहे. त्यामुळे आता शिवसेना-भाजपा युतीच्या नेत्यांनी प्रचाराकडे लक्ष केंद्रित केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर युतीच्या प्रचाराची धुरा असणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये एकूण आठ प्रचार सभा घेणार आहेत. त्यातील पहिली सभा 1 एप्रिल रोजी विदर्भातील वर्धा येथे होणार आहे. तर मोदींची शेवटची प्रचारसभा मुंबईत होणार आहे. या सभेत नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. तसेच संयुक्त मेळावे आणि सभेनंतर आता मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्रित सभा न घेता वेगवेगळा प्रचार करणार आहेत. शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जास्तीत जास्त ठिकाणी सभा घेता याव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  

Web Title: Narendra Modi's eight rally in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.