अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची मोदी सरकारबरोबर सेटलमेंट सुरु आहे - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 12:28 PM2017-09-21T12:28:35+5:302017-09-21T13:51:41+5:30
सार्वत्रिक निवडणूक जिंकण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. त्यात दाऊद इब्राहिमला भारतात आणण्याची योजना केंद्रात सुरु आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - सार्वत्रिक निवडणूक जिंकण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. त्यात दाऊद इब्राहिमला भारतात आणण्याची योजना केंद्रात सुरु आहे. स्वतः दाऊदला भारतात यायचे आहे. तो स्वतः विकलांग झाला आहे. त्यामुळेच सध्या तो केंद्र सरकारशी सेटलमेंट करत आहे असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेज लाँचच्या कार्यक्रमात केला.
राज ठाकरेंनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी सरकारच्या कारभारावर अत्यंत बोच-या शब्दात टीका केली. पण शिवसेनेवर टीका करण्याचे टाळले. भाजपाने केलेला सोशल मीडियाचा वापर, मुंबई मेट्रो, बुलेट ट्रेन यावर त्यांनी जोरदार टीका केली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कोणासाठी करताय ? बुलेट ट्रेनने अहमदाबाद जाऊन ढोकळा खाण्यापेक्षा इथे चांगले ढोकळे मिळतात.
गुजरात आणि मुंबईतल्या गुजराती माणसाच्या सोयीसाठी तुम्ही 1 लाख 10 हजार कोटींच कर्ज काढून बुलेट ट्रेन बनवताय अशी टीका त्यांनी केली. मुंबईतून मेट्रो ट्रेन जिथून जाणारे आहे तिथले जागांचे भाव प्रचंड वाढले आहेत. या ठिकाणी घर विकत घेणे कठिण बनले आहे. मेट्रोचा आराखडाही मराठी माणसाचे महत्व कमी करण्याच्या हेतूने आखण्यात आला आहे. विकास कामांच्या नावाखाली अन्य भाषिकांचे मतदारसंघ तयार करण्याचे काम सुरु आहे असे राज यांनी सांगितले.
शिवाजी पार्कमध्ये मोबाईलवर पुल देशपांडे ऐकणारा मराठी मातीशी एकरुप झालेला गुजराती माझा आहे. बुलेट ट्रेन, मेट्रोच्या आडून मराठी माणसाला नख लावायचा प्रयत्न झाला तर, धिंगाणा घालू असा इशाराच राज यांनी दिला. नरेंद्र मोदींचे 48 टक्के तर, राहुल गांधींचे 54 टक्के फॉलोअर्स फेक खोटे असल्याचा आरोप राज यांनी केला. भाजपाने निवडणुका जिंकण्यासाठी सोशल मीडियाचा भरपूर वापर केला. आता तोच सोशल मीडिया अंगाशी येतोय, तेव्हा अमित शहा सोशल मीडियावर विश्वास ठेऊ नका असे सांगत आहेत. भक्तांनी आता पट्टया काढल्या आहेत असे राज म्हणाले.
मी गंभीर असायला अजित पवार आहे का ? - राज ठाकरे.
वर्तमानपत्रांमध्ये खूप काम केलयं - राज ठाकरे.
फेसबुक पेजवर जे करु ते खर असेल, कुठलेही फुगवलेले आकडे नसतील - राज ठाकरे.
चॅनलच्या मालकांचे हात दगडाखाली, त्यामुळे अनेक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत - राज ठाकरे.
नरेंद्र मोदींच्या टि्वटर अकाऊंटवर 48 तर, राहुल गांधींच्या टि्वटर अकाऊंटवर 54 टक्के फॉलोअर्स फेक - राज ठाकरे.
नरेंद्र मोदींवर मार्मिक टीक, कितीही खोट बोललात तरी सत्य वर येणारच - राज ठाकरे.
सोशल मीडियावर काहीही लपून राहणार नाही, सोशल मीडिया अंगाशी आला तेव्हा अमित शहा बोलतात विश्वास ठेऊ नका, भक्तांनी पट्टया काढल्या.
नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत हे बोलणारा देशातला पहिला माणूस मी.
मोदी सरकारचे फक्त इव्हेंटस सुरु आहेत, त्यातून हाती काही येत नाहीय, चांगल काही घडत नाहीय, फक्त भाषण किती ऐकायची.
नोटाबंदीचा निर्णय फसला.
फुटबॉल वाटले भाजपाने आणि सिंधुदुर्गात लाथ मारली पहिली काँग्रेसने, नारायण राणेंवर उपरोधिक टीका.
साडेतीनवर्षात काहीही बदलल नाही, काँग्रेस आणि भाजपाच्या राज्यात स्थिती सारखीच.