चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लाचखोर सचिवाला रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 02:15 PM2017-10-27T14:15:15+5:302017-10-27T14:19:32+5:30
नाशिक : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे वॉटर प्रुफींग केलेल्या कामाचे प्रमाणपत्र देण्यासाठी ठेकेदाराकडे चोवीस हजार रुपयांची मागणी करून रक्कम घेतांना बाजार समितीचे सचिव गोरक्षनाथ निवृत्ती गांगुर्डे (३८,रा दिघवद ता चांदवड नाशिक) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़२७) रंगेहाथ पकडले़

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजाबराव उगले यांनी दिलेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील अनकाई येथील ठेकेदाराने चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे वॉटर प्रुफींगचे काम केले होते़ या कामाचा ५९ हजार २४१ रुपयांचा धनादेश दिल्याबद्दल तसेच काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी बाजार समितीचे सचिव गांगुर्डे यांनी गुरुवारी (दि़२६) २४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ याबाबत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़
ठेकेदाराच्या तक्रारीनुसार शुक्रवारी (दि़२७) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सापळा रचण्यात आला होता़ सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ठेकेदाराकडून सचिव गांगुर्डे यांनी २४ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच अधिकाºयांनी रंगेहाथ पकडले़ या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़