नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर, जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक अवैध शस्त्रसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 07:11 PM2018-05-15T19:11:25+5:302018-05-15T19:13:55+5:30
नाशिक : अवैध अग्निशस्त्रांचा वापर करून नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर शहर व जामखेड येथील खूनाच्या घटनेची विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांनी दखल घेऊन परिक्षेत्रात अवैध शस्त्रसाठा मोहिम राबविण्यात आली़ यामध्ये परिक्षेत्रातील जळगाव व नगर जिल्ह्यात सर्वाधिक शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे़

परिक्षेत्रातील नाशिक ग्रामीण, धुळे, जळगाव,नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यात अवैध शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी ६९ गुन्हे दाखल असून ९४ शस्त्र जप्त केली आहेत. यामध्ये १० पिस्टल, १९ गावठी कट्टे, ५४ काडतुसे, ४५ तलवारी, ५ चाकू, प्रत्येकी ४-४ कोयते, चॉपर तसेच २ सुऱ्यांसह कटर, कुºहाड, गुप्ती असे प्रत्येकी १-१ शस्त्रांचा समावेश आहे़ याबरोबरच पोलिसांनी चार वाहने, पाच निकामी काडतूसे व एक डबर बोर बंदुकही जप्त केली आहे.विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांनी दिलेल्या आदेशानुसार नाशिक परिक्षेत्रात ३ मे पासून अवैध शस्त्रसाठा मोहिम सुरू करण्यात आली़ या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली होती़ या मोहिमेत पाच जिल्ह्यांमध्ये अवघ्या बारा दिवसांत अवैध शस्त्रसाठ्याचे ६१ गुन्हे दाखल करून ७८ संशयितांना अटक करण्यात आली आहे.
जिल्हानिहाय जप्त केलेला शस्त्रसाठा
-----------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हा दाखल गुन्हे संशयित संख्या शस्त्रास्त्रांची माहिती
-----------------------------------------------------------------------------------------------------
नाशिक ग्रामीण ११ ११ ३ गावठी कट्टे,२ काडतुसे, १४ धारदार शस्त्रे
धुळे ११ ११ १ पिस्टल, ७ गावठी कट्टे, १० काडतुसे, ११ धारदार शस्त्रे
जळगाव २६ ३६ ३ पिस्टल, ४ कट्टे, २९ काडतुसे, २२ धारदार शस्त्रे
नंदुरबार ०३ ०४ २ पिस्टल, ४ तलवार
अहमदनगर १८ ३२ ४ पिस्टल, ५ गावठी कट्टे, १३ काडतुसे, १२ धारदार शस्त्रे
-----------------------------------------------------------------------------------------------------
एकूण ६९ ९४ १० पिस्टल, १९ कट्टे, ५४ काडतुसे, ६३ धारदार शस्त्रे, १डबल बोर बंदुक
२५ हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर बक्षीस
नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर, जामखेड या ठिकाणी अवैध अग्निशस्त्रांचा वापर करून केलेल्या खूनाच्या घटनेनंतर घातक शस्त्र बाळगणाºयांविरोधात कारवाईचे आदेश दिले होते़ त्यानुसार परिक्षेत्रात ही कारवाई करण्यात आली आहे़ नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यास संबंधिताचे नाव गुप्त ठेवले जाईल़ तसेच यशस्वी कारवाई झाल्यास २५ हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर बक्षीसही दिले जाईल़
- विनयकुमार चौबे, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र.