नाशिकच्या वाघ कृषी महाविद्यालयातील जळगावच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:46 PM2017-12-18T13:46:14+5:302017-12-18T13:51:36+5:30
नाशिक : आडगाव शिवारातील बळीरामनगरमध्ये राहणाºया वीस वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.१८) सकाळी उघडकीस आली़ शुभम सुभाष पाटील असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांना शुभमचे दोन्ही हात पाठीमागे बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्याची आत्हमत्या की खून याबाबत पोलिसही संभ्रमात आहेत़ दरम्यान, या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम हा मूळचा जळगाव जिल्हयातील रहिवासी असून क़ का़ वाघ कृषी महाविद्यालयात मायक्रो बायोलॉजीच्या तिसºया वर्षाचे शिक्षण घेत होता. धात्रक फाटा परिसरात असलेल्या बळीरामनगरमधील एका रो हाऊसमध्ये पाटीलसह अन्य चार - पाच विद्यार्थी एकत्रितपणे राहत होते़ रविवार (दि.१७) रात्रीच्या सुमारास सर्व विद्यार्थी वरच्या खोलीत झोपण्यासाठी गेले असता शुभम हा खालच्या खोलीत झोपला होता. सकाळी काही विद्यार्थी खालच्या खोलीत आले असता त्यांना शुभमचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर त्यांनी तत्काळ आडगाव पोलिसांना माहिती दिली़
या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिलकुमार पुजारी यांनी कर्मचाºयांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली़ शुभमचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तर हात पाठीमागे बांधलेले होते़ दरम्यान, शुभमने आत्महत्येपुर्वी लिहिलेली एक चिठ्ठीही पोलिसांना आढळून आली असून ती जप्त केली आहे. या चिठ्ठीमध्ये मी आत्महत्या करीत आहे असे लिहिलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एस. ए. सदाफुले तपास करीत आहेत.