एचआयव्ही प्रतिबंधासाठी लोकचळवळीची गरज -डॉ. दीपक सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 05:21 AM2017-12-01T05:21:38+5:302017-12-01T05:21:55+5:30

एचआयव्ही संसर्गाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना शासन व अशासकीय संस्थांना यश प्राप्त झाले आहे. एचआयव्ही प्रतिबंधासाठी लोकचळवळीतून एकत्रित काम करणे गरजेचे आहे.

 Need for social mobilization for HIV prevention Deepak Sawant | एचआयव्ही प्रतिबंधासाठी लोकचळवळीची गरज -डॉ. दीपक सावंत

एचआयव्ही प्रतिबंधासाठी लोकचळवळीची गरज -डॉ. दीपक सावंत

Next

मुंबई : एचआयव्ही संसर्गाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना शासन व अशासकीय संस्थांना यश प्राप्त झाले आहे. एचआयव्ही प्रतिबंधासाठी लोकचळवळीतून एकत्रित काम करणे गरजेचे आहे. राज्यात गुणवत्तापूर्ण सेवांवर लोकांचा असलेला दृढ विश्वास व जनसहभागामुळे महाराष्ट्र राज्य नेहमीच राष्ट्रीय स्तरावर प्रशंसेस पात्र ठरेल, असा विश्वास आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केला.
जागतिक एड्स दिनानिमित्त मंत्रालयात गुरुवारी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, आरोग्य सेवेचे संचालक डॉ.सतिश पवार, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. रेखा डावर, युएसएआयडीच्या एचआयव्ही डिव्हीजनच्या प्रमुख सेरा हैदारे उपस्थित होते. डॉ. सावंत म्हणाले, सामान्य रूग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष यांच्यामार्फत एक खिडकी योजनेतून गरजू रूग्णांचे अर्ज स्विकारून ते शासकीय लाभासाठी सादर करण्यात येतात. रूग्णांना व गरजूंना माहिती व मार्गदर्शन मिळावे यासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन १०९७ ही टोल फ्री सेवा सुरु केल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
यावेळी मातेपासून नवजात बालकाला एड्समुक्त करण्याचे कार्य करणाºया ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. रेखा डावर यांचा डॉ. सावंत यांनी सत्कार केला. यावेळी ठाणे शासकीय रुग्णालयाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यू.एस.एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यरत असलेल्या केएचपीटी आणि लिंकएड या अशासकीय संस्थांनी समुपदेशन करणाºयांना मार्गदर्शन मिळावे यासाठी एक पाऊल जीवनाकडे असा संदेश देणारे फ्लिप कार्ड, आॅडीओ जिंगल, जनजागृती संदर्भात पोस्टर यांचे प्रकाशन तसेच आरोग्य केंद्रात हवेतून पसरणाºया जंतूपासून संरक्षण व्हावे यासाठी तयार करण्यात आलेल्या फिल्टरचे उद्घाटन आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

Web Title:  Need for social mobilization for HIV prevention Deepak Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.