२२ जानेवारीला ‘नेट’ परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2016 05:02 AM2016-09-09T05:02:07+5:302016-09-09T05:02:07+5:30

कनिष्ठ सहायक प्राध्यापक पदासाठी यूजीसीतर्फे नेट (नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट) ही परीक्षा २२ जानेवारी २०१७ रोजी घेण्यात येणार आहे

The 'NET' test on 22nd January | २२ जानेवारीला ‘नेट’ परीक्षा

२२ जानेवारीला ‘नेट’ परीक्षा

Next

मुंबई : कनिष्ठ सहायक प्राध्यापक पदासाठी यूजीसीतर्फे नेट (नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट) ही परीक्षा २२ जानेवारी २०१७ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कनिष्ठ सहायक प्राध्यापक पदासाठी नेट अर्थात, नॅशनल एलिजिबिलेटी टेस्ट परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा ३५० गुणांची असते. या अंतर्गत तीन पेपर घेतले जातात. यात पर्यायी उत्तरात्मक प्रश्न, कारणे द्या, असे प्रश्न विचारले जातात. सीबीएससीतर्फे घेतली जाणारी यंदाची परीक्षा २२ जानेवारी २०१७ रोजी देशभरातील विविध केंद्रात होणार असून, या विषयीची अधिक माहिती १५ आॅक्टोबरपासून www.cbsenet.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

Web Title: The 'NET' test on 22nd January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.