नीतेश राणे यांनी अधिकाऱ्यांवर ‘मासळी’ भिरकावली
By admin | Published: July 7, 2017 04:04 AM2017-07-07T04:04:51+5:302017-07-07T04:04:51+5:30
मासेमारी बंदी कालावधीतही पर्ससीन जाळ्यांद्वारे मासेमारी होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी
Next
मासेमारी बंदी कालावधीतही पर्ससीन जाळ्यांद्वारे मासेमारी होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी येथील मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांना फैलावर घेतले.
मच्छिमारांनी हे आंदोलन केले. संतप्त कार्यकर्त्यांनी ‘बांगडा’ मासळीची टोपली आयुक्त वस्त यांच्या टेबलावर ओतली. यावर वस्त यांनी ही मासळी पकडण्यास मी सांगितले का? असे वक्तव्य केल्याने संतप्त आमदारांनी टेबलावरील मासळी त्यांच्या अंगावर भिरकावली.
राणे यांच्यासह भाजप मच्छिमार सेलचे रविकिरण तोरसकर, कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, भाई मांजरेकर, छोटू सावजी, दिलीप घारे यांच्यासह शंभर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.