राष्ट्रगीत सुरू असताना चक्कर आल्याने नितीन गडकरी रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 12:48 PM2018-12-07T12:48:27+5:302018-12-07T15:10:26+5:30
राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान चक्कर आल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राहुरी - राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान चक्कर आल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान, राष्ट्रगीत सुरू असताना गडकरींना अचानक चक्कर आली, त्यावेळी तिथे उपस्थित असलेले राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले. दरम्यान, नितीन गडकरींची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यासाठी नितीन गडकरी आले होते. यावेळी त्यांनी भाषणही केले. मात्र कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सुरू असताना चक्कर आल्याने गडकरी कोसळले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या राज्यपालांनी गडकरींना सावरले. तसेच डॉक्टरांनी तातडीने गडकरी यांची तपासणी केली. त्यानंतर गडकरी यांना रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, गडकरी यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त झाल्याने त्यांना भोवळ आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Just spoke to @nitin_gadkari ji. Thank God, he is fine. He said whenever he wears convocation attire he feels dizzy. He also said it was suffocating due to tightly closed pandal. His sugar went low. Nothing to worry. He's hale & hearty. May he be blessed with long & healthy life
— Vijay Darda (@vijayjdarda) December 7, 2018
नितीन गडकरींच्या प्रकृतीची विजय दर्डा यांनी केली विचारपूस
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राहुरी येथील कार्यक्रमात चक्कर येऊन पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, 'लोकमत' मीडिया प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष आणि एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी नितीन गडकरी यांच्या प्रकृतीची फोन करून विचारपूस केली. यावेळी पदवीदान कार्यक्रमावेळी परिधान केलेला कॉन्व्होकेशन ड्रेस आणि तिथे मोठ्या प्रमाणात असलेली गर्दी यामुळे चक्कर आल्याचे गडकरी यांनी सांगितले. तसेच आपली प्रकृती आता स्थिर असल्याची माहितीही त्यांनी दिली.