भारनियमनापासून दिलासा, बंद झालेले भारनियमन पुन्हा सुरू होणार नसल्याची ऊर्जामंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 02:18 PM2018-11-11T14:18:18+5:302018-11-11T14:18:40+5:30
दिवाळीदरम्यान भारनियमन बंद झाल्याने जनतेला काहीसा दिलासा मिळाला होता. आता दिवाळीदरम्यान, बंद झालेले भारनियमन पुन्हा सुरू होणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे
मुंबई - राज्यात निर्माण झालेल्या कोळशाच्या टंचाईमुळे राज्यातील जनतेला ऑक्टोबर महिन्यात भारनियमनाच्या झळा सोसाव्या लागत होत्या. मात्र दिवाळीदरम्यान भारनियमन बंद झाल्याने जनतेला काहीसा दिलासा मिळाला होता. आता दिवाळीदरम्यान, बंद झालेले भारनियमन पुन्हा सुरू होणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
भारनियमन बंद करण्याच्या निर्णयाबाबत माहिती देताना बावनकुळे म्हणाले की, ''राज्यातीला कोळशाची तूट भरून काढण्यात आली आहे. आता वीजकेंद्रांमध्ये कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे दिवाळीत बंद करण्यात आलेले भारनियमन आता पुन्हा सुरू होणार नाही." दरम्यान, राज्यातली बहुतांश भागात थकीत वीजबिलांचा प्रश्न गंभीर असून, शेतकऱ्यांनी जमेल तेवढी रक्कम जमा करावी, असे आवाहन केले आहे.