लॉग इन होत नाही; ‘जीएसटी’ रिटर्न भरणार कसे? साईटच लटकली : चार्टर्ड अकौंटंट, व्यापारी परेशान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 02:56 PM2017-08-19T14:56:22+5:302017-08-19T14:57:17+5:30

सोलापूर दि १९ : देशामध्ये वस्तू आणि सेवा कराचे पर्व मोठ्या दिमाखात सुरू झाले खरे; पण पहिलेच रिटर्न भरण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. ‘जीएसटी’ पोर्टलवर लॉग इन होत नसल्यामुळे रिटर्न भरणार कसे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे चार्टर्ड अकौंटंट आणि पर्यायाने व्यापारी परेशान झाले आहेत.

Not logged in; How to fill GST return? Site hangs: Chartered accountant, businessman troubled! | लॉग इन होत नाही; ‘जीएसटी’ रिटर्न भरणार कसे? साईटच लटकली : चार्टर्ड अकौंटंट, व्यापारी परेशान!

लॉग इन होत नाही; ‘जीएसटी’ रिटर्न भरणार कसे? साईटच लटकली : चार्टर्ड अकौंटंट, व्यापारी परेशान!

Next
ठळक मुद्देअ‍ॅटो जनरेटेड नोटीस ई - मेलव्दारे व्यापाºयांना मिळणार‘व्हॅट’चे ९३ टक्के व्यापारी ‘जीएसटी’मध्ये


रवींद्र देशमुख : सोलापूर लोकमत
सोलापूर दि १९ : देशामध्ये वस्तू आणि सेवा कराचे पर्व मोठ्या दिमाखात सुरू झाले खरे; पण पहिलेच रिटर्न भरण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. ‘जीएसटी’ पोर्टलवर लॉग इन होत नसल्यामुळे रिटर्न भरणार कसे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे चार्टर्ड अकौंटंट आणि पर्यायाने व्यापारी परेशान झाले आहेत.
ज्या व्यापाºयांनी वस्तू आणि सेवा कराचा नोंदणी क्रमांक घेतलेला आहे आणि टॅक्स इनपुट घेण्यास जे पात्र आहेत. त्यांच्यासाठी जुलै महिन्याचे रिटर्न भरण्याची अंतीम तारीख २० आॅगस्ट निश्चित करण्यात आली आहे; पण गेल्या चार - पाच दिवसांपासून ‘जीएसटी’ पोर्टलवर लॉग इन होत नसल्यामुळे अडचणी येत आहेत.
सोलापूर जिल्ह्यात साधारणत: २० हजार व्यापाºयांना रिटर्न भरावयाचा आहे. ज्या व्यापाºयांकडे प्रशिक्षित कर्मचारी आहेत, ते स्वत: रिटर्न भरत असले तरी बहुतांश व्यापारी चार्टर्ड अकौंटंटच्या माध्यमातून रिटर्न भरत आहेत. रिटर्न भरण्याच्या प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी सी. ए. श्रीनिवास वैद्य यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी लॉग इन होत नसल्याचे सांगितले. प्रस्तुत प्रतिनिधीने स्वत: लॉग इन करून पाहिल्यानंतरही पोर्टलवर लॉग इन होत नसल्याचेच दिसून आले. वैद्य म्हणाले की, सरकार इतकी घाई का करत आहे, हे समजत नाही. ‘जीएसटी’च्या नियमांचे पालन (कम्प्लायन्सेस्) करण्यासाठी सरकारने सर्वप्रथम त्रुटी नाहीशा करून सुविधा दिल्या पाहिजेत. प्रारंभीच्या काळात सरकारच्या वतीने पोर्टलवर कोणतीही अडचण येणार नसल्याची ग्वाही दिली होती; पण प्रत्यक्षात तसे होत नाही. शिवाय अनेक व्यापाºयांचे आणखी मूल्यवर्धित कराच्या अकाऊंटचे काम पूर्ण व्हायचे आहे. त्याशिवाय त्यांना ‘जीएसटी’मध्ये येता येणार नाही.
सी. ए. अश्विनी दोशी यांनीही लॉग इन होत नसल्याबद्दलचीच तक्रार सांगितली. त्या म्हणाल्या की, लॉग इन व्यवस्थित होत नसल्यामुळे आम्हाला रात्री - अपरात्री काम करावे लागत आहे. व्यापारी मंडळी चार्टर्ड अकौंटंटस्कडूच रिटर्न भरण्याचे काम करून घेत आहेत. त्यामुळे आमच्यावर या कामाचा आता ताण आलेला आहे. आम्हाला कुटुंबासाठी द्यायला सध्या वेळही मिळत नाही. सरकारने एकांगीपणे विचार करून ही करप्रणाली सुरू केली आहे. व्यापाºयांना जर दर तीन महिन्याला रिटर्न भरावे लागणार असेल तर त्यांनी व्यापार करायचा तरी कधी? असा प्रश्नही दोशी यांनी उपस्थित केला.
--------------------------
अ‍ॅटो जनरेटेट नोटीस
वस्तू आणि सेवा कराचे रिटर्न पोर्टलवरून भरले नाही तर अ‍ॅटो जनरेटेड नोटीस ई - मेलव्दारे व्यापाºयांना मिळणार आहे. नोटीसीची एक प्रत संबंधित जिल्ह्यातील ‘जीएसटी’ कार्यालयातही जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत रिटर्न भरणे व्यापाºयांसाठी बंधनकारक आहे. पण या पोर्टलवरील तांत्रिक अडचणी व्यापाºयांसाठी त्रासदायक ठरत आहेत.
-----------------------------
‘व्हॅट’चे ९३ टक्के व्यापारी ‘जीएसटी’मध्ये
सोलापुरात मूल्यवर्धित कराची नोंदणी असलेल्या व्यापाºयांची संख्या १५ हजार २०० इतकी होती. जुलैमध्ये नवीन वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर यामध्ये ‘व्हॅट’मधील ९३ टक्के व्यापारी आले आहेत. या व्यापाºयांची संख्या १४हजार १०० इतकी असून, यंत्रमागाला नवीन कर लागू झाल्यामुळे ही ‘जीएसटी’ नोंदणीकृत व्यापाºयांची संख्या आणखी वाढेल, अशी माहिती या विभागाचे उपायुक्त विभीषण चवरे यांनी दिली.
 

Web Title: Not logged in; How to fill GST return? Site hangs: Chartered accountant, businessman troubled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.