स्कुबा डायव्हिंग सेंटरला ‘पॅडी’ची मान्यता

By admin | Published: January 22, 2015 02:00 AM2015-01-22T02:00:46+5:302015-01-22T02:00:46+5:30

‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ स्कुबा डायव्हिंग अ‍ॅण्ड अ‍ॅक्वाटिक स्पोटर््स’ या स्कुबा डायव्हिंग सेंटरला मंगळवारी ‘पॅडी’या आंतरराष्ट्रीय संस्थेची मान्यता मिळाली आहे.

'Paddy' approval for Scuba Diving Center | स्कुबा डायव्हिंग सेंटरला ‘पॅडी’ची मान्यता

स्कुबा डायव्हिंग सेंटरला ‘पॅडी’ची मान्यता

Next

संदीप बोडवे
ल्ल मालवण (जि़सिंधुदुर्ग)
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तारकर्ली येथे उभारलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ स्कुबा डायव्हिंग अ‍ॅण्ड अ‍ॅक्वाटिक स्पोटर््स’ या स्कुबा डायव्हिंग सेंटरला मंगळवारी ‘पॅडी’या आंतरराष्ट्रीय संस्थेची मान्यता मिळाली आहे. या मान्यतेमुळे हा प्रकल्प जगाच्या नकाशावर येणार असून, आशिया खंडातील हा एकमेव प्रकल्प असेल.
‘पॅडी’चे एशिया पॅसिफिकचे विभागीय व्यवस्थापक अँड्रेस अवूर यांनी आॅक्टोबरमध्ये स्कुबा डायव्हिंग सेंटरला भेट देऊन निकषांची तपासणी केली होती. आंतरराष्ट्रीय मानकानुसार सर्व निकष पूर्ण केल्यानंतर येथील स्कुबा डायव्हिंग सेंटरला ‘पॅडी’ची मान्यता मिळाली आहे. या संस्थेशी संलग्न राहून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग प्रकल्प हाती घेतला आहे.

पॅडी म्हणजे काय ?
प्रोफेशनल असोसिएशन आॅफ डायव्हिंग इन्स्ट्रक्टर्स (पॅडी) ही आॅस्ट्रेलियातील स्कुबा डायव्हिंग सेंटर्सचे मानके निश्चित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जगभरात १८० देशांपेक्षा जास्त देशांमध्ये ‘पॅडी’ची मान्यता असलेली स्कुबा डायव्हिंग सेंटर्स आहेत. पॅडीची मान्यता मिळालेले ‘इसदा’ हे भारतातील पहिले व एशिया पॅसिफिकमधील महत्त्वाचे एक स्कुबा डायव्हिंग सेंटर ठरले आहे.

असे आहे
स्कुबा डायव्हिंग सेंटऱ़़
तारकर्ली येथील या डायव्हिंग सेंंटरमध्ये १० मीटर खोलीचा स्विमिंग टँक, प्रशस्त व अद्ययावत क्लासरूम, संगणकीय लॅब, चेंजिंग रूम, आॅक्सिजन युनिट, फिल्टरेशन युनिट यांचा समावेश आहे. याशिवाय अमेरिकन बनावटीच्या तीन स्पीड बोटींचाही समावेश यात आहे.

गेल्या कित्येक वर्षांच्या मेहनतीचे फळ आम्हाला मिळालेले आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जगाच्या नकाशावर येत आहे.
- डॉ. सारंग कुलकर्णी, जनरल मॅनेजर अँड चीफ इन्स्ट्रक्टर, इसदा, तारकर्ली

जगातील स्कुबा डायव्हिंग सेंंटरला मान्यता देणाऱ्या पॅडी संस्थेने तारकर्लीच्या सेंटरला मान्यता दिली, ही देशाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. या सेंटरचा लाभ घेण्याऱ्यास आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळेल.
- सुबोध किन्हळेकर, व्यवस्थापक, साहसी क्रीडा विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई

Web Title: 'Paddy' approval for Scuba Diving Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.