पंचगंगा घाट परिसर पर्यटकांचे आकर्षक केंद्र बनेल- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 05:14 PM2018-03-25T17:14:57+5:302018-03-25T17:14:57+5:30

जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी पंचगंगा गदी घाट विकसित करणे आवश्यक असून सुमारे २६ कोटी रुपयांचा हा संपूर्ण प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल, त्यामुळे हा परिसर शहरवासीयांसह पर्यटकांचे आकर्षक केंद्र बनेल, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

Panchganga Ghat Campus will be an attractive center for tourists - Chandrakant Patil | पंचगंगा घाट परिसर पर्यटकांचे आकर्षक केंद्र बनेल- चंद्रकांत पाटील

पंचगंगा घाट परिसर पर्यटकांचे आकर्षक केंद्र बनेल- चंद्रकांत पाटील

Next

कोल्हापूर :  जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी पंचगंगा गदी घाट विकसित करणे आवश्यक असून सुमारे २६ कोटी रुपयांचा हा संपूर्ण प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल, त्यामुळे हा परिसर शहरवासीयांसह पर्यटकांचे आकर्षक केंद्र बनेल, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत कोल्हापुरात पंचगंगा नदी घाट विकसित करण्याच्या योजनेचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते रविवारी सकाळी झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती हे होते.  पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही ठिकाणे विकसित करून पर्यटन वाढसाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

पर्यटन वाढले तर आपोआपच रोजगारही उपलब्ध होतील. हाच उद्देश ठेवून पंचगंगा घाट विकसीत करण्यात येत असून पहिल्या टप्प्यातील ५ कोटी रुपये खर्चातून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, उद्यान करण्यात येत असून दोन वर्षातच पंचगंगा घाट परिसर शहरवासीयांचे व पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र बनेल. सकाळी नदीवर पोहण्यासाठी येणाऱ्यांना चेंजिंग रुम आणि स्वच्छतागृह बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापुरात मोठी इंडस्ट्रीज येण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यामुळे किमान ४ ते ५ हजार लोकांना कामधंदा मिळेल, असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला.

पंचगंगा नदीचे प्रदूषण हा मोठा प्रश्न बनल्याने तो सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. शाहू छत्रपती यांनीही, पंचगंगा घाट सुशोभिकरणासह नदी शुद्धीकरणासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आमदार अमल महाडिक, डॉ. सुजीत मिणचेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदाशिव साळुंखे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, नियोजन अधिकारी सरिता यादव, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, नगरसेवक विजय सूर्यवंशी, किरण शिराळे, किरण नकाते, रुपाराणी निकम, माधवी गवंडी, सरिता मोरे आदी उपस्थित होते. 
----------
पर्यटनवाढीसाठी दोन महिने सहलीचे
जिल्ह्यात १५ एप्रिलपासून दोन महिने पर्यटन सहलीचे आयोजन केले असून आठवड्यातून किमान दोन दिवस सहलीचे आयोजन केले आहे. सहभागी पर्यटकांची राहण्याची, भोजनाची, वाहनाची सोय केली जाईल. जिल्ह्यातील दुर्लक्षीत आठ स्थळे दाखविण्यात येणार आहेत. राधानगरीत सुमारे आठ हजार फुलपाखरांचे गार्डन विकसीत करुन पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
-------------
पुरातन मंदिरेही विकसित
पंचगंगा नदीच्या पात्रात व परिसरात अनेक पुरातन मंदिर, दिपमाळा असल्याने त्याचीही डागडुजी करून तेही सुशोभीत करण्यात येणार आहे, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. अशीही घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केली.
----------
नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गावांनी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प करावेत 
मंत्री पाटील म्हणाले, पंचगंगा शुध्दीकरण करणे आवश्यक आहे त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, पंचगंगा आणि रंकाळ्यात सांडपाणी मिसळणार नाही प्रयत्न करावेत, तसेच पाळीव जनावरे धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करू. नदीकाठच्या गावांनीही प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी नदीत सोडण्याऐवजी त्यांनी गावातच सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प करावेत, त्यासाठी शासनस्तरावर निधी देऊ असेही आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले.
----------

Web Title: Panchganga Ghat Campus will be an attractive center for tourists - Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.