पोलीस ठाणे म्हणजे पोलिसांचे घरच - रश्मी शुक्ला
By admin | Published: August 31, 2016 07:58 PM2016-08-31T19:58:01+5:302016-08-31T19:58:01+5:30
पोलीस ठाणे हे पोलिसांसाठी घरच असते; किंबहुना घरापेक्षाही अधिक महत्वाची जागा असते. ज्या ठिकाणी काम करतो ती जागा स्वच्छ, सुंदर आणि छान असली की काम करण्यासाठी
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 31 - पोलीस ठाणे हे पोलिसांसाठी घरच असते; किंबहुना घरापेक्षाही अधिक महत्वाची जागा असते. ज्या ठिकाणी काम करतो ती जागा स्वच्छ, सुंदर आणि छान असली की काम करण्यासाठी उत्साह येतो. डेक्कन पोलीस ठाण्याच्या इमारतीचे नुतणीकरण झाल्यामुळे पोलिसांना येथे काम करताना नक्कीच समाधान वाटेल असे मत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केले.
डेक्कन पोलीस ठाण्याच्या नुतणीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन शुक्ला, माजी पोलीस निरीक्षक जयसिंग मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार विजय काळे, सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद, अतिरीक्त आयुक्त (गुन्हे) सी. एच. वाकडे, परिमंडल एकचे उपायुक्त सुधीर हिरेमठ, नगरसेविका ज्योत्सा सरदेशपांडे, माजी अतिरीक्त महासंचालक अशोक धिवरे, सहायक आयुक्त टी. डी. गौड, प्रवीण कुलकर्णी, वरिष्ठ निरीक्षक बी. जी. मिसाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुचेता खोलके, कोथरुडच्या निरीक्षक (गुन्हे) राधिका फडके उपस्थित होते. शुक्ला म्हणाल्या, ह्यआपण जेव्हा पहिल्यांदा डेक्कन पोलीस ठाण्याला भेट दिली. तेव्हा येथे गाड्यांचा ढीग दिसत होता. फारच वाईट अवस्था होती. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षक सुषमा चव्हाण यांना नुतणीकरण करुन घेण्याच्या सुचना दिल्या. चव्हाण यांनी विविध क्षेत्रातील लोकांकडून मदत मिळवून इमारतीचे नुतणीकरण केले.ह्ण नुतणीकरणासाठी मदत केलेल्या सर्वांचे शुक्ला यांनी आभार मानले.
आमदार काळे म्हणाले ह्यराजकीय सामाजिक आंदोलनांसाठी अनेकदा डेक्कन पोलीस ठाण्याच्या लॉकआॅपमध्ये बसावे लागलेले आहे. अनेकदा अटक होऊन या पोलीस ठाण्याच्या आतमध्ये कार्यकर्ता म्हणून दिवस काढलेले होते. आज तीच वास्तू चांगल्या प्रकारे उभी राहीली आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांसाठी एक लाख घरांचा संकल्प केला असून त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी स्वतंत्रपणे पोलीस हाऊसिंगसाठी देण्यात आल्याचे काळे म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वरिष्ठ निरीक्षक सुषमा चव्हाण यांनी केले.