प्राचार्यांविनाच चालतेय पोलीस प्रशिक्षण केंद्र

By admin | Published: August 9, 2015 02:31 AM2015-08-09T02:31:40+5:302015-08-09T02:31:40+5:30

पोलीस दलात भरती होणाऱ्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उपराजधानीतील पोलीस प्रशिक्षण केंद्राचा कारभार प्राचार्यांविनाच चालत असल्याची बाब समोर आली आहे.

Police Training Center is run without a preliminary inquiry | प्राचार्यांविनाच चालतेय पोलीस प्रशिक्षण केंद्र

प्राचार्यांविनाच चालतेय पोलीस प्रशिक्षण केंद्र

Next

नागपूर : पोलीस दलात भरती होणाऱ्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उपराजधानीतील पोलीस प्रशिक्षण केंद्राचा कारभार प्राचार्यांविनाच चालत असल्याची बाब समोर आली आहे. ७०० हून अधिक प्रशिक्षणार्थी असलेल्या या केंद्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांची मिळून ५६ पदे रिक्त आहेत. माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात येथील रिक्त पदे, प्रशिक्षणार्थ्यांची संख्या, मिळणारे अनुदान इत्यादींबाबत विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलीस प्रशिक्षण केंद्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांची मिळून ३१२ मंजूर पदे आहेत. ३१ जुलै रोजी देण्यात आलेल्या माहितीनुसार यातील ५६ पदे रिक्त आहेत.
यात प्राचार्य, उपप्राचार्य, पाच पोलीस निरीक्षक या पदांचादेखील समावेश आहे. (प्रतिनिधी)
५ वर्षात ३४ प्रशिक्षणार्थी गेले बाहेर
गेल्या ५ वर्षांत पोलीस प्रशिक्षण केंद्रात ६२७८ प्रशिक्षणार्थी दाखल झाले. यातील ३४ प्रशिक्षणार्थ्यांना नियम तोडल्याबद्दल बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. १५ नोव्हेंबर २०१४ पासून सुरू झालेल्या आत्ताच्या प्रशिक्षणादरम्यान ५ प्रशिक्षणार्थी नियम तोडल्याबाबत केंद्राबाहेर गेले आहेत. यंदाच्या प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षणार्थ्यांची संख्यादेखील बरीच घटली असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Police Training Center is run without a preliminary inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.