कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 04:17 AM2018-05-11T04:17:53+5:302018-05-11T04:17:53+5:30
मराठवाडा, विदर्भासह राज्यातील काही जिल्हे तापलेलेच असून गुरुवारी सांयकाळी कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापुरला वादळी वा-यासह वळवाच्या पावसाने झोडपले काही ठिकाणी गाराही पडल्या. पावसाने तिघांचे बळी घेतले.
मुंबई/कोल्हापूर/सोलापूर - मराठवाडा, विदर्भासह राज्यातील काही जिल्हे तापलेलेच असून गुरुवारी सांयकाळी कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापुरला वादळी वा-यासह वळवाच्या पावसाने झोडपले काही ठिकाणी गाराही पडल्या. पावसाने तिघांचे बळी घेतले.
चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४६ तर जळगावमध्ये ४५ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भ व मराठवाड्यात ४० अंशाच्या वर तापमान होते. मुंबईवर दिवसभर मळभ दाटून आले होते. परिणामी, ‘ताप’दायक वातावरणात भर पडली. हवामानातील बदलाने मुंबईकरांना घाम फोडला आहे.
सायंकाळी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाºयासह पाऊस झाला. कोल्हापुरच्या पन्हाळा तालुक्यातील घोटवडे येथे विजेच्या आवाजाने एका महिला तर विट्याजवळ वीज पडून एक महिला ठार झाली. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जिल्ह्याच्या अनेक भागात अर्धातासाहून अधिक वेळ पाऊस झाला.
च्सांगलीत रेणावी घाटाच्या पायथ्याशी वीज पडून एक महिला ठार झाली. सांगली शहर आणि परिसरात सायंकाळी तासभर गारांसह मुसळधार पाऊस झाला.
गोव्याला झोडपले
पणजी : गोव्याला बुधवारी मध्यरात्री वादळी वाºयासह पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वीजप्रवाह खंडित झाला. गुरुवारी सकाळपर्यंत वीजप्रवाह खंडितच होता. मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. शेतीची मळणी करून भात उघड्यावर ठेवले होते. ते भिजले.