...जेवढं पाणी मुरलं तेवढ्यात दुष्काळ संपला असता - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 06:13 PM2018-08-12T18:13:29+5:302018-08-12T19:48:13+5:30
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत सत्तेत असलेल्या सगळ्या पक्षांचे नेते इथे बसलेत. पानी फाऊंडेशनच्या कामामुळे जर जलसंधारणचं काम होऊ शकतं तर इतक्या वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे ?असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
पुणे : महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत सत्तेत असलेल्या सगळ्या पक्षांचे नेते इथे बसलेत. पानी फाऊंडेशनच्या कामामुळे जर जलसंधारणचं काम होऊ शकतं तर इतक्या वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे ?असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आदी उपस्तिथ होते.
(पाण्यासाठी सगळ्यांचा एकच पक्ष - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)
(काहीजण बोलघेवड्या सारखं बोलतात; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला)
गावातल्या लोकांना जागृत करण्याचं काम आमिर खान करत असेल तर सरकार काय करतं असेही राज ठाकरे म्हणाले. राज यांनी आपल्या मनोगतात चौफेर टीका केली. राज म्हणाले, जलसंधारणामध्ये जेवढं पाणी मुरलं तेवढ्यात राज्यातील दुष्काळ नाहीसा झाला असता. पानी फाऊंडेशन मध्ये सरकारी अधिकारी काम करतात तर, सरकारच्या कामात सरकारी अधिकारी काम का करत नाहीत? आमिर खान कधी कुठला पुरस्कार घेत नाही. मात्र मॅगसेस पुरस्कार मिळेल तेव्हा तो नक्की घेईल. प्रेक्षकांनी तुम्ही श्रमदानासाठी कधी येणार असा प्रश्न केला असता श्रमदानासाठी नक्की येईल सरकार मध्ये नसल्याने मला फावडं कसं चालवायचं हे माहित नाही तेवढं नक्की शिकवा.