राज ठाकरेंचा मुलगा अमितकडे आहे हे खास टॅलेंट, महेश मांजरेकरांनी दिली होती ऑफर !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 03:28 PM2017-12-14T15:28:51+5:302017-12-14T15:31:00+5:30

अमित ठाकरे हे अजून राजकारणापासून अलिप्त आहेत. ठाकरे घराण्यात बऱ्याच दिवसानंतर सनईचौघडा वाजणार असल्यामुळे त्यांच्याबाबत चर्चा आहे.

Raj Thackeray's son Amit has a special talent, Mahesh Manjrekar had given the offer! | राज ठाकरेंचा मुलगा अमितकडे आहे हे खास टॅलेंट, महेश मांजरेकरांनी दिली होती ऑफर !

राज ठाकरेंचा मुलगा अमितकडे आहे हे खास टॅलेंट, महेश मांजरेकरांनी दिली होती ऑफर !

Next

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे सध्या बराच चर्चेत आहे. नुकताच त्याचा लहानपणीची मैत्रिण मिताली बोरुडे हिच्यासोबत साखरपूडा झाला.  विशेष म्हणजे, 11 डिसेंबर रोजी राज ठाकरेंच्या लग्नाच्या वाढदिवशीच दोघांचा साखरपुडा झाला.
अमित ठाकरे हे अजून राजकारणापासून अलिप्त आहेत. ठाकरे घराण्यात बऱ्याच दिवसानंतर सनईचौघडा वाजणार असल्यामुळे त्यांच्याबाबत चर्चा आहे. आपल्या भाषणांसोबत राज ठाकरेंना व्यंगचित्रासाठीही ओळखलं जातं. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेकडे देखील हे टॅलेंट आहे, तो सुद्धा स्केचिंग करतो. तो आपल्या वडिलांपेक्षाही चांगले स्केचिंग करतो असंही म्हटलं जात. अमितने महानायक अमिताभ बच्चनपासून ते लता मंगेशकर यांच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटिजची स्केचेस काढली आहेत. ही स्केचेस अमित अनेकदा सोशल साईटवर शेयर करत असतो.
महेश मांजरेकरांनी दिली होती ऑफर-
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मध्यंतरी सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर याच्यासोबत 'एफयू'  हा सिनेमा केला. या सिनेमात त्यांनी सर्वप्रथम अमित ठाकरेला ऑफर दिली होती. महेश यांनी राज ठाकरेंना याबाबत विचारले तेव्हा राज यांनी त्यास साफ नकार दिला होता. 
कोण आहे मिताली बोरूडे - 
मिताली आणि अमित ठाकरे हे बालमित्र आहेत. मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि आता विवाहबंधनात होणार आहे. मिताली फॅशन डिझायनर आहे. प्रख्यात बालरोग तज्ञ संजय बोरूडे यांची ती कन्या आहे.  

Web Title: Raj Thackeray's son Amit has a special talent, Mahesh Manjrekar had given the offer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.