राम मंदिर राजकीय नव्हे; देशाच्या अस्मितेचा प्रश्न - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 05:12 AM2018-12-15T05:12:31+5:302018-12-15T05:15:06+5:30

राम मंदिर हा कोणत्या पक्षाचा किंवा राजकीय नव्हे तर तो देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे खा़ संजय राऊत यांनी केले. 

Ram temple is not political; The question of identity of the country - Sanjay Raut | राम मंदिर राजकीय नव्हे; देशाच्या अस्मितेचा प्रश्न - संजय राऊत

राम मंदिर राजकीय नव्हे; देशाच्या अस्मितेचा प्रश्न - संजय राऊत

Next

पंढरपूर : राम मंदिर हा कोणत्या पक्षाचा किंवा राजकीय नव्हे तर तो देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे खा़ संजय राऊत यांनी केले. 

पंढरपुरातील चंद्रभागा मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची २४ डिसेंबर रोजी सभा होणार आहे़ त्यानिमित्त ते शुक्रवारी पंढरपुरात आले होते़ पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत सभा घेतली़ त्याला चांगला प्रतिसाद मिळाला़ याची देशाने दखल घेतली़ त्यानंतर दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपुरात महासभा होणार आहे़ या सभेला राज्यातील शिवसैनिकांसह साधू, संत, महाराज, मठाधिपती येणार आहेत़ शिवसेनेला धार्मिक अधिष्ठान लाभलेले आहे़ राममंदिर हा हिंदंूच्या अस्मितेचा विषय आहे़ हे मंदिर व्हावे ही शिवसेनेची भूमिका आहे़

Web Title: Ram temple is not political; The question of identity of the country - Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.