राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कायद्याच्या चौकटीत आणा- प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 05:11 PM2019-02-04T17:11:13+5:302019-02-04T17:16:57+5:30
भारिप बहुसंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा आणि आरएसएसवर टीका केली आहे.
लातूर- भारिप बहुसंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा आणि आरएसएसवर टीका केली आहे. भाजपावाले संविधान मोडायला निघाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानाला मानत नाही. आरएसएसमध्ये अनेक स्लीपर सेल्स आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आरएसएसवर निशाणा साधला आहे. आरएसएसला कायद्याच्या चौकटीत आणण्याचा काँग्रेसनं तो ड्राफ्ट आम्हाला द्यावा, तरच काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा विचार करू.
ओबीसी आणि मराठ्यांमध्ये विस्तव जात नाही. ओबीसींच्या बाबतीत काँग्रेसची भूमिका आम्हाला मान्य नाही, असंही ओवैसी म्हणाल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहेत. तसेच केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये सुरू असलेल्या वादावरही प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे. केंद्र सरकार आणि पश्चिम बंगालच्या सरकारमध्ये बिनसलं आहे. ममता बॅनर्जींची भूमिका योग्य आहे. ममता बॅनर्जी आणि चंद्राबाबू नायडू यांनी सीबीआयला हस्तक्षेप करून देणार नसल्याचं केंद्राला आधीच सांगितलं आहे. त्यामुळे केंद्रानं राज्यांच्या अधिकारांत हस्तक्षेप करू नये. काँग्रेसला आघाडीसाठी आम्ही अनेक पर्याय दिले.
आमचा किंवा एमआयएमचा पंतप्रधान होणार नाही. पंतप्रधान हा काँग्रेसचाच होणार आहे. दलितांमध्ये भविष्यात चांगला नेता मला दिसत नाही. महाराष्ट्राच्या नेत्यांनी निवडणुकांसाठी आराखडा तयार करायला हवा. त्यामुळे त्यांना काँग्रेसची खरी ताकद कळेल. काँग्रेसचे अनेक नेते भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहेत. रॉबर्ट वड्रा, चिदंबरम हे भ्रष्टाचारात गुरफटलेले आहेत. अशोक चव्हाणही त्याच प्रकारातील नेते आहेत. काँग्रेसनं मुकाट्यानं आम्हाला पाठिंबा द्यावा, काँग्रेस कोणत्याही अटी आणि शर्थी ठेवण्याच्या स्थितीत नाही. कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवायचं हे अजून नक्की झालेलं नाही.