साहित्य महामंडळ सेन्सॉरबोर्ड नाही : श्रीपाद जोशी

By Admin | Published: December 25, 2016 10:23 PM2016-12-25T22:23:09+5:302016-12-25T22:23:09+5:30

लेखकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते. त्यामुळे त्यांच्या लेखनाला कात्री लावण्याचा अधिकार साहित्य महामंडळाला नाही.

Sahitya Mahamandal is not a sensor board: Shripad Joshi | साहित्य महामंडळ सेन्सॉरबोर्ड नाही : श्रीपाद जोशी

साहित्य महामंडळ सेन्सॉरबोर्ड नाही : श्रीपाद जोशी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 25 - लेखकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते. त्यामुळे त्यांच्या लेखनाला कात्री लावण्याचा अधिकार साहित्य महामंडळाला नाही. जर संमेलनाध्यक्षांच्या लेखी भाषणात काही वादग्रस्त अथवा अक्षेपार्ह मुद्दे असतील, तर त्या विधानाशी महामंडळ नक्कीच सहमत नसेल. मात्र त्यात काटछाट करण्याचा कोणताही अधिकार महामंडळाला नाही. महामंडळ केवळ प्रकाशकाच्या भूमिकेत असते, सेन्सॉरबोर्डाच्या नाही आणि त्याने असता कामाही नये, अशा शब्दातं अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी संमेलनाध्यक्षाच्या भाषणाबाबतची भूमिका अधोरेखित केली.
गेल्या वर्षी पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यान अध्यक्षीय भाषणावरून साहित्य महामंडळ आणि संंमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यात कलगीतुरा रंगला होता. महामंडळाने जाणीवपूर्वक भाषण प्रसिद्ध होऊ दिले नाही, त्यातील वाटणारे आक्षेपार्ह मुद्दे वगळले असा आरोप सबनीस यांनी महामंडळावर केला होता. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांचे भाषण एका प्रकाशकाच्या भूमिकेतून नजरेखालून घालणार का? याविषयी विचारले असता महामंडळाला भाषणात बदल करण्याचा कोणताही अधिकार नाही. राज्यघटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, ती पूर्णपणे लेखकाची वैयक्तिक मते असतात. अध्यक्षाचे भाषण वेळेत महामंडळाकडे आले पाहिजे या मताशी सहमत आहे. मात्र अध्यक्षाचचे भाषण वाचूनच प्रकाशित केले पाहिजे. अथवा त्यातील काही विधाने वगळण्याचा कोणताच अधिकार महामंडळाला नाही. कारण संमेलनाध्यक्ष असणे हा लेखकाचा सन्मान आहे. त्यांच्या अभिव्यक्तीवर गदा आणणे ही निषेधार्ह गोष्ट आहे. अध्यक्षाच्या लेखी भाषणातील काही विधानाबाबत मतभेद असू शकतात. मात्र त्यावरुन महामंडळाने नाराज होण्याचे काही कारण नाही. सबंधित विधानाबाबत फारतर महामंडळ सहमत नसल्याची भूमिका जाहीरपणे घेऊ शकते, असेही जोशी यांनी सांगितले.

साहित्यिकांनी वारक-यांच्या भूमिकेत असावे
साहित्यिक वारकरी असतील आणि संमेलन त्यांच्यासाठी पंढरी असेल, तर कोणताच वारकरी वारीला जाताना मानधन, जेवण, तिकीट अथवा राहण्याच्या व्यवस्थेची अपेक्षा करीत नाही. अगदी त्याच प्रमाणे आपण स्वत:ला साहित्याचे वारकरी म्हणून घेत असू , तर संमेलनाला येताना मानधन, राहण्याची व्यवस्था तसेच जेवणाची सुविधा यांची अपेक्षा करता कामा नये. ही माझी महामंडळ अध्यक्ष म्हणून नाही, तर वैयक्तिक भूमिका आहे. यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या एकट्याचा नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

 

Web Title: Sahitya Mahamandal is not a sensor board: Shripad Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.