सारंगखेडा घोडेबाजार : पाच कोटींची ‘पद्मा’, महाराणा प्रताप यांच्या चेतकची वंशज असल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 01:29 AM2017-12-16T01:29:17+5:302017-12-16T01:30:00+5:30
देशात सर्वाधिक ७२ इंच उंचीच्या ‘पद्मा’ घोडीचे गुरुवारी सारंगखेडा अश्व बाजारात आगमन झाले़ या घोडीला पाहण्यासाठी येथे अश्वप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती़ गेल्या वर्षीही ‘पद्मा’ ही चर्चेचा विषय ठरली होती.
सारंगखेडा ता. शहादा (जि. नंदुरबार) : देशात सर्वाधिक ७२ इंच उंचीच्या ‘पद्मा’ घोडीचे गुरुवारी सारंगखेडा अश्व बाजारात आगमन झाले़ या घोडीला पाहण्यासाठी येथे अश्वप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती़ गेल्या वर्षीही ‘पद्मा’ ही चर्चेचा विषय ठरली होती.
इंदोर येथील पद्मा हॉर्स फॉर्मचे मालक बालकृष्ण चंदेल यांच्या मालकीची ही घोडी असून, नऊ फूट लांब, सात क्विंटल वजन असलेली काठेवाडी जातीची नुकरी घोडी आहे. पद्माचे वय ४ चार वर्षे व ११ महिने आहे. ती महाराणा प्रताप यांच्या चेतक या घोड्याची वंशज असल्याचा चंदेल यांचा दावा आहे. तिची किंमत पाच कोटी रुपये असून, ती दोन कोटींपर्यंत पुष्कर मेळ्यात मागितली गेली
होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण व पंतप्रधान मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी घोडीचे मालक चंदेल यांचा गौरव केल्याची छायाचित्रे या ठिकाणी लावण्यात आली आहेत़ त्याचबरोबर पर्यटनमंत्री जयकुमार रावल, चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, मंजितसिंह तोमर, विजयसिंह परिहार, श्रीलंका येथील अधूला या अश्वप्रेमींनीही तिचा गौरव केला आहे.
पद्माच्या देखभालीसाठी पाच जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. दररोज तीन लीटर गायीचे दूध, दोन किलो चना डाळ, पाच किलो चापड भुसा, हिरवा चारा असा खाद्य पदार्थांचा तिचा खुराक असतोे. दररोज एक तास तिची मसाज व एक तास रपेट घेतली जाते.
सारंगखेडा येथील आयोजन नियोजन भारतातील इतर यात्रांपेक्षा वेगळे आहे, असे बालकृष्ण चंदेल म्हणाले. गेल्या दोन वर्षांपासून ते या यात्रेत ही पद्मा घोडी घेऊन येत आहेत. त्यांच्या फार्मवर अजून चार घोडे उच्च जातीचे आहेत.
देशातील सर्वांत उंची घोडी
यात्रोत्सवात पद्मा ही घोडी दाखल झाली आहे़ तब्बल ७२ इंच उंच असलेली पद्मा ही देशातील सर्वांत उंच घोडी आहे़ घोडेबाजारात या घोडीची किंमत तब्बल पाच कोटी रुपये असून पांढºया शुभ्र पद्माला पाहण्यासाठी गर्दी उसळली आहे़ गेल्या वर्षीदेखील पद्मा चर्चेचा विषय ठरली होती़