मुंबई- पुणे महामार्गावर भीषण अपघात, सात जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 17:02 IST2018-07-15T17:02:24+5:302018-07-15T17:02:54+5:30
मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाटा येथे दोन कारच्या भीषण अपघातात सात जण जागीच ठार झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला.

मुंबई- पुणे महामार्गावर भीषण अपघात, सात जण ठार
लोणावळा : मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाटा येथे दोन कारच्या भीषण अपघातात सात जण जागीच ठार झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली स्विफ्ट कारच्या (MH 14 CX 8339) चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर सदर कार रस्ता दुभाजकावरुन विरुद्ध लेनवर जात पुण्याच्या दिशेने येणा-या सॅन्ट्रो कारला ( MH 12 EX 1682) जोरात धडकली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट कारमधील पाच जण आणि सॅन्ट्रो कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, सॅन्ट्रो कारमध्ये असलेलले आणखी दोघे जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघातानंतर पुण्याकडे जाणार्या मार्गावर सुमारे दोन किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.