घोड्यावरून बोंडअळीचे पंचनामे, कृषी कर्मचा-यांची शक्कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 04:36 AM2017-12-28T04:36:10+5:302017-12-28T04:36:38+5:30
वैजापूर (जि. औरंगाबाद) : कृषी खात्यातील कर्मचा-यांनी चक्क घोड्यावर बसून बोंडअळीचे पंचनामे केल्याने ‘उंटावरून शेळ्या हाकणे’ या म्हणीचा प्रत्यय वैजापूर तालुक्यातील शेतक-यांना आला.
वैजापूर (जि. औरंगाबाद) : कृषी खात्यातील कर्मचा-यांनी चक्क घोड्यावर बसून बोंडअळीचे पंचनामे केल्याने ‘उंटावरून शेळ्या हाकणे’ या म्हणीचा प्रत्यय वैजापूर तालुक्यातील शेतक-यांना आला. या प्रकरणी संबंधित कर्मचाºयांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
बोंडअळीमुळे वैजापूर तालुक्यातील कपाशीचे मोठे नुकसान झाले. याचे पंचनामे करुन दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत. अंचलगाव येथे गणेश चोभे यांच्या शेतातील कपाशीचा पंचनामा तलाठी समाधान पैठणे व कृषी सहाय्यक पुंडे यांनी चक्क घोड्यावर बसून केला. याचा पुरावा म्हणून घोड्यावर स्वार असलेली छायाचित्रेही काढून घेतली. याच छायाचित्रांनी त्यांना अडचण केली.
>घोड्यावर बसणे पडले महाग!
उपविभागीय अधिकारी डॉ.संदीपान सानप यांनी या कर्मचाºयांना लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. त्यावर, आपण केवळ शेतकºयांच्या आग्रहाखातर घोड्यावर स्वार झाल्याचा खुलासा कर्मचाºयाने केला.
>औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यात बोंडअळीमुळे झालेल्या कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी घोड्यावर स्वार झाले होते.
>हा प्रकार म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असल्याची उपरोधिक टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.