धक्कादायक ! औरंगाबादमध्ये शासकीय रुग्णालयात पाण्यासाठी थांबले शवविच्छेदन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 01:09 PM2017-10-17T13:09:34+5:302017-10-17T13:10:06+5:30

घाटी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया पाणी नसल्यामुळे थांबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.यामुळे तीन मृतदेहांचे शविच्छेदन थांबले असून नातेवाईक मृतदेह मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

Shocking In Aurangabad, a government hospital stopped the body for postmortem due to lack of water | धक्कादायक ! औरंगाबादमध्ये शासकीय रुग्णालयात पाण्यासाठी थांबले शवविच्छेदन

धक्कादायक ! औरंगाबादमध्ये शासकीय रुग्णालयात पाण्यासाठी थांबले शवविच्छेदन

googlenewsNext

औरंगाबाद : घाटी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया पाणी नसल्यामुळे थांबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.यामुळे तीन मृतदेहांचे शविच्छेदन थांबले असून नातेवाईक मृतदेह मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

रुग्णालयाच्या माहितीनुसार येथे दररोज २ ते १४ मृतदेहाचे शवविच्छेदन होते. यासाठी मोठ्याप्रमाणात पाण्याची आवश्यकता असल्याने येथे दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत. मात्र, जलवाहिनीच्या नादुरुस्तीने आज रुग्णालयाला पाणीपुरवठा झाला नाही. यामुळे शवविच्छेदन करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. सकाळपासून केवळ २ मृतदेहाचे शवविच्छेदन झाले आहे तर तीन मृतदेह अजूनही प्रतीक्षेत आहेत. रुग्णालय प्रशासनाने लागलीच पाण्याचा टँकर मागविला आहे. पाणी उपलब्ध झाल्यानंतरच हे शवविच्छेदन होणार असल्याने नातेवाईक हतबल झाली आहेत.
 

Web Title: Shocking In Aurangabad, a government hospital stopped the body for postmortem due to lack of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.