सिंहगडाच्या रस्त्यावरून गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 02:53 AM2017-07-28T02:53:31+5:302017-07-28T02:53:42+5:30

पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरून विधानसभेत गुरुवारी चांगलाच गदारोळ झाला. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, पतंगराव कदम यांनी हा प्रश्न लावून धरला.

Sinhgad road, mantralya, news | सिंहगडाच्या रस्त्यावरून गदारोळ

सिंहगडाच्या रस्त्यावरून गदारोळ

googlenewsNext

मुंबई : पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरून विधानसभेत गुरुवारी चांगलाच गदारोळ झाला. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, पतंगराव कदम यांनी हा प्रश्न लावून धरला. शेवटी या कामासाठी ५ कोटींची तरतूद मंजूर केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आयआयटीकडून सूचना मागवून त्यानुसार काम करण्यात येणार आहे. मार्च २०१८ पर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरील दरडीबाबात सदस्य भीमराव तापकरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी दिले. पण सदस्यांचे समाधान होत नव्हते. संबंधित खात्याचे कॅबिनेट मंत्री सभागृहात हजर होते. त्यामुळे अजित पवार यांनी पाटील यांना उत्तर देण्यात काय अडचण आहे, असा सवाल केला. तेव्हा पाटील यांनी राज्यमंत्री योग्य उत्तर देत आहेत, असे सांगून त्यांनी दिलेलेच उत्तर परत दिले. पोटे-पाटील म्हणाले, या रस्त्यावर काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडतात तसेच नागमोडी वळणे असल्याने वाहतुकीचा खोळंबाही होतो. या रस्त्यावरील सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण सर्वेक्षण आणि दरडी प्रवणक्षेत्राची पाहणी करण्यासाठी मुंबईतील आयआयटी यांना प्रस्ताव देण्यात आला होता. त्यांनी अभ्यासपूर्ण अहवाल दिल्यावर त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मात्र लवकरात लवकर म्हणजे कधी, हवेत बोलू नका, तारीख सांगा, असा आग्रह पवार यांनी धरला.

हा रस्ता ७.५० कि.मी. वन विभागाअंतर्गत आणि १.५० कि.मी. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येत असल्याने दोन्ही विभागांच्या समन्वयाने तातडीने हे काम पूर्ण करण्यात येत असल्याचेही पाटील यांनी सांगितले. या वेळी सदस्य विजय काळे, पतंगराव कदम यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.

Web Title: Sinhgad road, mantralya, news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.