मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह १० शहरं होणार स्मार्टसिटी

By admin | Published: July 31, 2015 04:03 PM2015-07-31T16:03:18+5:302015-07-31T16:03:44+5:30

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण - डोंबिवलीसह राज्यातील १० शहरात निवड केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Smart City to take 10 cities including Mumbai, Thane, Kalyan, Dombivli | मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह १० शहरं होणार स्मार्टसिटी

मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह १० शहरं होणार स्मार्टसिटी

Next

 

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ३१ - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण - डोंबिवलीसह राज्यातील १० शहरात निवड केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 
शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील स्मार्ट सिटीसंदर्भात विधीमंडळात निवेदन दिले. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य उच्चाधिकार समितीची नेमण्यात आली होती. या समितीने नवी मुंबई, पुणे , पिंपरी - चिंचवड, नाशिक, ठाणे, मुंबई, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण - डोंबिवली, औरंगाबाद या दहा शहरांची निवड केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

Web Title: Smart City to take 10 cities including Mumbai, Thane, Kalyan, Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.