सोशल व्हायरल, पुणेरी पाट्या

By admin | Published: November 17, 2016 08:15 PM2016-11-17T20:15:33+5:302016-11-17T20:36:14+5:30

500 आणि 1000च्या नोटा बंद करून काळ्या पैशावर मोदींनी सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर लोकांमधून याबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

Social Viral, Puneer Patya | सोशल व्हायरल, पुणेरी पाट्या

सोशल व्हायरल, पुणेरी पाट्या

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 17 - 500 आणि 1000च्या नोटा बंद करून काळ्या पैशावर मोदींनी सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर लोकांमधून याबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्णयाचे स्वागत केले आहे, काहींनी या निर्णयातून निर्माण झालेल्या समस्याबाबत आगपाखड केली आहे. त्यातच 500 आणि 1000च्या नोटांचे विडंबनात्मक फोटो फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्स अपवर वा-यासारखे पसरले होते. मोदींच्या या निर्णयाचा अनेकांना त्रास झाला असून, बँकेच्या बाहेरच्या रांगा काही संपण्याचं नाव घेत नाही आहेत. आता बँकेबाहेरच्या रांगावरूनही गमतीशीर मेसेज व्हायरल झाले आहेत. थट्टामस्करीसाठी नेहमीच आघाडीवर असलेल्या पुणेरी पाट्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनोद होऊ लागले आहेत. 
 
- सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही विनोदी पाट्या
 
-  ही कोणाच्याही तिर्थरूपांची बँक नसून सर्वांनी लायनीत उभे राहून आत येणे
-  "तुला माईत्ये का मी कोने?" म्हणणाऱ्यांना नोटा बदलून मिळणार नाहीत.
-  दादागिरी करणार्यांना जुन्या 500 च्या नोटा दिल्या जातील
- फॉर्म नीट भरा, दादा, तात्या, अण्णा, यांना आम्ही ओळखत नाही, कारण आम्ही आत्ता बाप आहोत.
- अरेरावी करू नये, कोणीही तुमच्या मदतीला येणार नाहीत कारण जुना नोटा कामाच्या नाहीत.
- उगाच पाणी वाटप वगैरे कार्य करुन मते ओढण्याचा प्रयत्न करू नये, आणि गर्दी वाढवू नये,आम्ही पाण्याने भरलेला माठ आणि पेला ठेवला आहे. लोकं आपापली घेतील.
- विनाकारण कोणी केमेरे चालू करून लोकांना तुमचे काय मते? काय वाटतंय नोटा बंद झाल्यावर वगैरे लोकांचे इंटेर्विव्यु घेत बसू नये, सरकार ने फायनल निर्णय घेतलाय, आता कोणी काही हि बदलू शकत नाही... #नोटांशीवाय
- घाई करू नये, हि बँक आहे लोकल ट्रेन नाही.
- कॅशिअर सोबत फालतू वाद घातल्यास केशिअर ला झोपायला सेपरेट बेड ची सोय आहे, विचार करून बोला.
- आम्ही तुमचे सेवक आहोत, नोकर नाही.
- हे पुणे आहे, सभ्य भाषेत अपमान करायची इंडायरेक्ट पद्धत आहे.
- नोट हि लक्ष्मी आहे, त्यामुळे तिच्यासोबत इथे सेल्फी काढत बसू नये... 
- थोडा उशीर होत असलेतरी भाईगिरी न करता लायनीतच थांबावे, इथे आजूबाजूला पोलीस आहेत, आणि तुमच्याकडे 500-1000 व्यतिरिक्त दुसऱ्या नोटा नाहीत.
- गर्दी असल्याने वेळ लागणारच, तरी कृपया सारखं पिचिक पिचिक आवाज काढू नये... घरी पैसे साठवायला आम्ही सांगितलं न्हवते.
 - हा परीक्षा हॉल नाही, तरी, इतरांचा फॉर्म पाहून भरू नये.
- अजून किती वेळ लागेल वगैरे फाजील प्रश्न विचारू नये,
कारण त्याचे उत्तर आम्हालाही माहित नाही.
- इथे गाडी पार्क केली तर चालेल का वगैरे पांचट प्रश्न विचारू नये. 
- ATM चालू आहे का हे पाहण्यासाठी ATM च्या बाहेर लाईन आहे का ते पाहावे.
- सरकार कडून मिळालेलेच फोटो भिंतीवर लावले आहेत, तरी आमच्या यांचा फोटो नाहीये वगैरे वाद घालू नये.
- "शी बाबा" म्हणून उकडणे थांबत नाही, तुमच्या इतकंच आम्हालाही उकडते आहे, आणि आहेत तेवढे सगळे फॅन्स चालू ठेवलेत.
- आमच्याकडे ज्या नोटा अव्हेलेबाल आहेत त्याच आम्ही देऊ शकतो, आमचा स्वतःचा नोट छापायचा कारखाना नाही.
- सर्वांच्या नोटा दिसायला सारख्याच आहेत, त्यामुळे विनाकारण, तुझी बघू... तुझी बघू करत वेळकाढू पणा करून गर्दी वाढवू नये.
- आपली संस्कृती आणि आई वडिलांची शिकवण हि आपण गर्दीत वयस्कर लोकांशी कसे बोलतो यवरूनही समजून येते.
- उगाच मोठ्या मोठ्या राजकर्त्यांनी बँकेत येऊन लोकांना कित्ती कित्ती त्रास होतोय याची चाचणी करत बसू नये, मोठा निर्णय आहे, थोडा त्रास तर होणारच.
- "अातापर्यंत किती काळे पैसे बँकेत जमा झाले ओ???"
हा प्रश्न विचारू नये. कारण आम्ही एकही काळ्या रंगांची नोट घेत नाही.
- "काका जरा पटापट करा ना" म्हणून आम्हाला सल्ला देऊ नये, आम्ही माणूस आहोत आणि मशीन नाही.
- 1000 च्या नोटा बंद करून 2000 ची नोट का? असले फाजील प्रश्न आम्हाला विचारू नये. त्यासाठी रात्री कुठलाही न्यूज चॅनल लावून भांडणे पहात बसावे.
- दारावर उभ्या असणाऱ्या शिपायाशी भांडू नये, त्याच्याकडे भरलेली बंदूक आहे.
- घुसखोरी केलेल्या बांग्लादेशवासीयांनी आता आमचे काय होणार वगैरे प्रश्न विचारून आमचा वेळ वाया घालवू  नये, घुसायाच्या आधी आम्हाला विचारले होते का?
- आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत,  निशिंत रहावे
- किती हि गर्दी असेल तरी ही दुपारी 1 ते 4 बँक बंद....
...... राहणार नाहीत, काळजी नसावी.

Web Title: Social Viral, Puneer Patya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.