विद्रोही साहित्य संमेलनाचे सूप वाजले!
By admin | Published: January 19, 2015 01:15 AM2015-01-19T01:15:37+5:302015-01-19T01:15:37+5:30
बुलडाणा येथील विद्रोही साहित्य संमेलनात १0 ठराव पारीत; चळवळ गतीमान करण्याचे आवाहन.
बुलडाणा : प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध सक्षमपणे लढा द्यायचा असेल तर विद्रोही चळवळ गतीमान करा, या चळवळीत इतरांनाही सहभागी करून घ्या, असे आवाहन विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत पवार यांनी रविवारी केले. १३ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप्रसंगी ते बोलत होते. संमेलनात १0 ठरावही पारीत करण्यात आले. बुलडाणा येथील जिजामाता महाविद्यालयच्या प्रांगणात ताराबाई शिंदे साहित्यनगरीत संमेलन पार पडले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दरवर्षी शासनाकडून दिला जाणारा २५ लाख रूपयाचा निधी बंद करण्यात यावा, यासोबतच मुंबई येथे झालेल्या मुंबई काँग्रेसच्या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवैज्ञानिक गोष्टीचा पुरस्कार केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्या निषेधाच्या ठरावासह एकूण १0 ठराव पारित करून. अध्यक्षस्थानी सिद्धार्थ जगदेव तर विचार मंचावर किशोर ढमाले, डॉ.अजीज नदाफ, प्रतिमा परदेशी, संमेलनाध्यक्ष जयंत पवार, जाजूबाई गावीत उपस्थित होते, जयश्रीताई शेळके, प्रशांत सोनुने आदी उपस्थित होते. यावेळी सिध्दार्थ जगदेव यांनी ठरावाचे वाचन केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात ठरावाला अनुमोदन दिले.
*संमेलनात पारित झालेले ठराव
*प्राथमिक शिक्षणामध्ये संगणकीकरण सक्तीचे व मोफत असावे.
*मुंबईत झालेल्या विज्ञान काँग्रेस संमेलनामध्ये खुद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्र्यांनी अवैज्ञानीक गोष्ठीचा पुरस्कार केला त्यांचा हे संमेलन जाहीर निषेध करीत आहे.
*संस्कृतीची सक्ती नको ते एैच्छीक ठेवा.
*परकीय भाषेऐवजी मातृभाषेतून इंजिनियरिंग, वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून द्यावा.
*मराठी भाषेचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे.
*स्त्री-पुरूष तुलनाकार ताराबाई शिंदे यांच्या नावाने सर्व विद्यापिठामध्ये समाजशास्त्र विभागात अध्यासने स्थापन करावे.
*ताराबाई शिंदे यांचा बुलडाणा शहरातील वाडा पुर्नरचित करून त्यांचे यथोचित स्मारक उभारावे.
*महात्मा फुल्यांचे आद्यचरित्रकार पंढरीनाथ पाटील यांच्या नावाने महाराष्ट्र समाज व संस्कृती अभ्यास केंद्र स्थापन करावे.
*सांस्कृतीक दहशतवादाचे निषेध.