अभिमत विद्यापीठांच्या स्वतंत्र प्रवेश प्रक्रियेला सुप्रीम कोर्टाची मनाई
By admin | Published: September 16, 2016 03:52 PM2016-09-16T15:52:01+5:302016-09-16T15:52:01+5:30
मेडिकलसाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया करता येणार नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने अभिमत विद्यापीठांना चांगलाच दणका दिला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,दि.16- मेडिकलसाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया करता येणार नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने अभिमत विद्यापीठांना चांगलाच दणका दिला आहे. राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर आज आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यात सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली .
‘नीट’मार्फतच प्रवेश परीक्षा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर अभिमत विद्यापीठांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रिया घेण्याचा आदेश राज्याने दिला होता. याविरूद्ध अभिमत वैद्यकीय महाविद्यालये मुंबई उच्च न्यायालयात गेली होती. मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारच्या आदेशाला स्थगिती दिली होती. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.
प्रवेश प्रक्रियेसाठी प्रत्येक अभिमत विद्यापीठ प्रत्येकी पाच हजार रुपये घेतं, म्हणजे आठ अभिमत विद्यापीठांसाठी चाळीस हजारांचा खर्च विद्यार्थ्यांना येईल. त्याऐवजी फक्त एक हजार रुपयांमध्ये राज्य सरकार प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून देण्यास तयार आहे असे राज्य सरकारने दाखल केलेल्या विशेष याचिकेत म्हटले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे मात्र,त्यामुळे अभिमत विद्यापीठांमध्ये वैद्यकीय शाखेतील प्रवेशाचा तिढा कायम आहे.