शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक आज सैन्यात रुजू होणार: लेफ्टनंटपदाची सूत्रे घेणार; प्रशिक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 03:59 AM2017-09-09T03:59:18+5:302017-09-09T03:59:33+5:30

जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये शहीद झालेले पोगरवाडी (ता. सातारा) येथील कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा शनिवार,दि. ९ रोजी लेफ्टनंट पदाचा दीक्षांत समारोह होणार आहे.

Swati Mahadik, wife of Shaheed Santosh Mahadik, will join the army today: will take the form of lieutenant post; Training completed | शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक आज सैन्यात रुजू होणार: लेफ्टनंटपदाची सूत्रे घेणार; प्रशिक्षण पूर्ण

शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक आज सैन्यात रुजू होणार: लेफ्टनंटपदाची सूत्रे घेणार; प्रशिक्षण पूर्ण

googlenewsNext

सातारा : जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये शहीद झालेले पोगरवाडी (ता. सातारा) येथील कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा शनिवार,दि. ९ रोजी लेफ्टनंट पदाचा दीक्षांत समारोह होणार आहे. या सोहळ्यासाठी महाडिक कुटुंबीयांसह स्वाती यांच्या माहेरची मंडळीही चेन्नईत दाखल झाली आहे. गेल्या अकरा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे येथील देहूरोड येथे होणार आहे.
नोव्हेंबर २०१५मध्ये कुपवाडा येथे ४१ राष्ट्रीय राईफल्स बटालियनचे नेतृत्व करताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर ‘शौर्यचक्र’ पुरस्कारही दिला गेला.
शहीद कर्नल संतोष यांच्या अंत्यसंस्कार विधीदरम्यान स्वाती महाडिक यांनी आपण देशसेवेत रुजू होणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच आपल्या मुलांनाही सैन्यातच भरती करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार, त्या आता सैन्यदलात रूजू होत आहेत.
प्रशिक्षणात अव्वल...-
‘सैन्यात भरती होणं,’ या एकाच उद्देशाने झपाटून गेलेल्या स्वाती महाडिक या प्रशिक्षणार्थींमध्येही अव्वल राहिल्या. चेन्नई येथे शुक्रवारी प्रशिक्षण तळावर झालेल्या कौतुक सोहळ्यात ‘बेस्ट कॅडेट’ म्हणून मिळालेलं पदक कुटुंबीयांना दाखविताना त्यांच्या भावना अनावर झाल्या.

Web Title: Swati Mahadik, wife of Shaheed Santosh Mahadik, will join the army today: will take the form of lieutenant post; Training completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.