महाराष्ट्र एसआयटी वाघमारेचा घेणार ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 04:36 AM2018-06-17T04:36:43+5:302018-06-17T09:27:32+5:30

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारे याचा ताबा महाराष्ट्र ‘एसआयटी’चे पथक घेणार असल्याचे सूत्रांकडून समजले.

Take control of Maharashtra SIT Waghmare | महाराष्ट्र एसआयटी वाघमारेचा घेणार ताबा

महाराष्ट्र एसआयटी वाघमारेचा घेणार ताबा

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारे याचा ताबा महाराष्ट्र ‘एसआयटी’चे पथक घेणार असल्याचे सूत्रांकडून समजले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी व गौरी लंकेश यांची हत्या एकाच पिस्तुलातून केल्याची माहिती कर्नाटक एसआयटीने शुक्रवारी दिली आहे.
गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी बंगळुरू येथे गोळ्या घालून हत्या झाली. ही हत्या आपणच केल्याची कबुली वाघमारे याने कर्नाटक एसआयटीला दिली आहे. लंकेश यांच्यासह कलबुर्गी आणि पानसरे या तिघांच्या हत्येसाठी एकाच पिस्तुलाचा वापर झाल्याचा संशय होता. जप्त केलेल्या गोळ्या आणि रिकाम्या पुंगळ्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासल्यानंतर आलेल्या अहवालातून तसा दुजोराही मिळाला होता. त्यानुसार वाघमारे याला पानसरे हत्येच्या तपासासाठी महाराष्टÑ एसआयटीचे पथक ताब्यात घेणार आहे. पानसरे कुटुंबीयांनीही वाघमारे याच्याकडे चौकशी करण्याची मागणी तपास यंत्रणेकडे केली आहे.
कर्नाटक एसआयटीने लंकेश हत्येप्रकरणी सहा आरोपींना अटक केली आहे. त्यातील पाच आरोपी महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विचारवंतांच्या हत्येप्रकरणी पहिल्यांदाच कर्नाटक तपास यंत्रणेच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. कोल्हापूर पोलीस व महाराष्टÑ एसआयटी कर्नाटक एसआयटीच्या संपर्कात असून, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संशयित वाघमारे याचा ताबा घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.
>कर्नाटक ‘एसआयटी’च्या संपर्कात आम्ही पहिल्यापासून आहोत. आमचे पथक बंगलोरला जाणार आहे. परशुराम वाघमारेचा पानसरे हत्येत सहभाग असल्याचा एक जरी पुरावा मिळाला तरी आम्ही त्याचा ताबा घेणार आहोत.
- संजयकुमार, एसआयटी प्रमुख, पुणे

Web Title: Take control of Maharashtra SIT Waghmare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा