राज्यातील तापमानाचा पारा पस्तीशी पार : उन्हाच्या झळा वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 02:38 PM2019-03-16T14:38:28+5:302019-03-16T14:44:02+5:30
मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वरचा (३२.७ अंश सेल्सिअस) अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअसच्या पलिकडे गेला आहे.
पुणे : गेल्या आठवड्यापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ नोंदविली असून, विदर्भ वगळता राज्यात हीच स्थिती राहील असा अंदाज आहे. राज्यात कमाल तापमानाचा पारा पस्तीशीपार गेला आहे. चंद्रपूर, ब्रम्हपुरी आणि सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान चाळीशीच्या घरात होते.
मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वरचा (३२.७ अंश सेल्सिअस) अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअसच्या पलिकडे गेला आहे. तसेच किमान तापमान देखील १५ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा ३९.१ आणि किमान तापमानाचा पारा २१.६ अंश सेल्सिअसच्या घरात असल्याने, येथील उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. राज्यात चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ३९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्या खालोखाल ब्रम्हपुरी येथे ३९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले.
मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद, परभणी आणि नांदेडचा कमाल तापमानाचा पारा ३७ ते ३९ दरम्यान होता. तर, औरंगाबादला ३५.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. विदर्भात बुलडाणा (३३.५ अंश सेल्सिअस) वगळता उर्वरीत जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा ३७ ते ३९ अंश सेल्सिअसच्या घरात होता. विदर्भ आणि मध्यप्रदेशचा दक्षिण भाग, तसेच मध्य महाराष्ट्रात वाºयाची चक्राकार स्थिती झाली असून, मराठवाडा आणि कर्नाटकच्या उत्तर भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे विदभार्तील काही ठिकाणी येत्या १९ मार्च पर्यंत पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. तर, रविवारी (दि. १७) तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल असा अंदाज वेधशाळेने वर्र्तविला आहे.
--
पुण्याचा पारा छत्तीशीच्या जवळपास
पुण्यामध्ये शुक्रवारी कमाल तापमान ३६ आणि किमान तापमान १५.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. लोहगावचे कमाल तापमान ३६.४ आणि किमान तापमान १७.६ अंश सेल्सिअस होते. बुधवारचा (दि. २०) अपवाद वगळता पुढील पाच दिवस शहरातील वातावरण कोरडे राहील. तसेच, कमाल तापमानाचा पारा देखील ३५ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
-
प्रमुख शहरांत गेल्या २४ तासांत नोंदविलेले कमाल / किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुढीलप्रमाणे:
मुंबई ३२.४/२१.५, सांताक्रूझ ३६.६/१९, अलिबाग ३१.५/१९.५, रत्नागिरी ३३.५/२०.३, पुणे ३६/१५.३, अहमदनगर ३८.६/१७.१, जळगाव ३६/१७, कोल्हापूर ३६.७/२१.४, महाबळेश्वर ३२.७/१८.४, मालेगाव ३५.२/१८, नाशिक ३३.७/१५.२, सांगली ३८/१८.२, सातारा ३६.१/१७.६, सोलापूर ३९.१/२१.६, उस्मानाबाद ३७.७/१९.७, औरंगाबाद ३५.२/२०.२, परभणी ३९/२०.५, नांदेड ३८/२०, बीड ३७.५/१८.६, अकोला ३७.७/२१.४, अमरावती ३८.८/१९.२, बुलडाणा ३३.५/२०.८, ब्रम्हपुरी ३९.४/२१.५, चंद्रपूर ३९.६/२३.८, गोंदिया ३५.६/१७.७, नागपूर ३६.७/१९.८, वाशिम ३७/२०.४, वर्धा ३७.२/२२.८, यवतमाळ ३८.५/२०.