२०१६मध्ये एकही अंगारकी नाही
By admin | Published: January 1, 2016 02:33 AM2016-01-01T02:33:08+5:302016-01-01T02:33:08+5:30
नवीन वर्ष २०१६ हे वर्ष लीप वर्ष असल्याने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस आहेत. त्यामुळे वर्ष ३६५ ऐवजी ३६६ दिवसांचे असणार आहे. तर यंदाच्या वर्षभरात एकही अंगारकी संकष्टी
मुंबई : नवीन वर्ष २०१६ हे वर्ष लीप वर्ष असल्याने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस आहेत. त्यामुळे वर्ष ३६५ ऐवजी ३६६ दिवसांचे असणार आहे. तर यंदाच्या वर्षभरात एकही अंगारकी संकष्टी चतुर्थी नसल्याची माहिती पंचागकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली.
मकर संक्रांती दरवर्षी १४ जानेवारीला येते असा आपला गैरसमज आहे. पण प्रत्यक्षात तसे नसते. मकर संक्रांतीचा दिवस पुढे पुढे जात असतो. या नूतनवर्षी मकर संक्रांती १५ जानेवारीला येणार आहे. मार्च, एप्रिल, आॅगस्ट , आॅक्टोबर महिन्यात सलग चार दिवस सुट्ट्या आल्याने चाकरमान्यांना बाहेरगावी जायची संधी मिलणार आहे. तसेच सा सुट्ट्या रविवारला जोडून येणार आहेत. तर गणेशाचे आगमन दहा दिवस अगोदर ५ सप्टेंबर रोजी होत आहे. गौरी- गणपतींचा मुक्काम सहा दिवसांचा असणार आहे. नव्या वर्षात १४ एप्रिल,१२ मे, ९ जून, असे तीन दिवस गुरुपुष्यामृत योग सुवर्ण खरेदी साठी येत आहेत.
तर संकष्टी चतुर्थी मंगलवारी न आल्याने नूतन वर्षामध्ये एकही अंगारकी चतुर्थी येत नाही. बुधवार, ९ मार्च रोजी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण पूर्व भारतातून दिसणार आहे. मुंबई पुण्यातून दिसणार नाही. १८
आॅगस्ट रोजी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण आणि एक सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाहीत.
१६ सप्टेंबर रोजी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. तर नव्या वर्षात जानेवारी, फेब्रुवारी , मार्च, एप्रिल, जुलै, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात विवाह मुहूर्त आहेत. १ मे रोजी मुहूर्त आहे. नंतर शुक्र अस्त असल्याने उर्वरित मे - जून मध्ये मुहूर्त नाहीत.
बुधाचे अधिक्रमण
बुध ग्रह ज्यावेली सूर्यबिंबावर आलेला दिसतो त्याला ‘बुधाचे अधिक्रमण’ म्हणतात. नूतन वर्षी बुधाचे अधिक्रमण भारतातून दिसणार आहे. सोमवार ९ मे रोजी सायंकाळी ४.४४ वाजता बुध ग्रह सूर्यबिंबावर येईल. तो सूयर् बिंबावरून बाहेर पडण्यापूर्वीच सायंकाळी ७.०३ वाजता सूर्यास्त होईल. हे दृश्य साध्या डोळ््यांनी पाहू नये. जाणकारांच्या मदतीने दुर्बिणीच्या साहाय्याने सूर्याची प्रतिमा पांढऱ्या कागदावर पाडून त्यामध्ये हे दृश्य पाहावे . सूर्यबिंबावर बुधाची काली तीट लावलेले दृश्य दिसेल. हे बुध कृत सूर्यग्रहणच असेल. यानंतर ११ नोव्हेंबर २०१९ रोजी बुधाचे अधिक्रमण होईल.