...त्या बैठकीत काँग्रेससोबत तीव्र मतभेद झाले; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 07:58 PM2019-12-02T19:58:54+5:302019-12-02T19:59:55+5:30
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला. यानंतर राज्यातील आलेल्या राजकीय़ भूकंपावरही खुलासा केला.
मुंबई : अजित पवारांनी शपथ घेतल्याचा फोन आला, माझा विश्वासच बसत नव्हता. मात्र, त्यांच्या शपथविधीला उपस्थित असलेले चेहरे पाहिले आणि निश्वास सोडल्याचा खुलासा शरद पवारांनी केला.
एबीपी माझाने आज शरद पवार यांची मुलाखत घेतली. यामध्ये पवार यांनी मोठे खुलासे केले. त्यांनी यावेळी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला. यानंतर राज्यातील आलेल्या राजकीय़ भूकंपावरही खुलासा केला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचा मला फोन आला पण विश्वास बसला नाही. पण त्यातले चेहरे पाहिल्यानंतर हे लोक माझं ऐकणारे असल्याने आपण हे सुधारु शकतो हे लक्षात आल आणि त्या आमदारांना परत आणल्याचे पवारांनी सांगितले.
काँग्रेस आणि राष्ट्रवीदमध्ये बैठकी होत होत्या नेहरू सेंटरमध्ये दुर्दैवाने काँग्रेसच्या नेत्यांशी माझेच तीव्र मतभेद झाले. सत्तास्थापनेवरून नाही तर काही वेगळ्या विषयांवरून वाद झाले. त्या बैठकीतून मी बाहेर पडलो. इथे बसण्यात काही अर्थ नाही म्हणालो. ही वादावादी झाली तेव्हा आमच्याकडून प्रफुल्ल पटेल, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष होते. अजितने काही सहकाऱ्यांना सांगितले की आताच जर हे अशी टोकाची भूमिका घ्यायला लागले तर हे सरकार चालणार कसे. नंतर शिवसेना येणार, त्यामुळे काँग्रेसची भूमिका योग्य नाही. यानंतर अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचा धक्कादायक खुलासा केला.
फडणवीसांना वाटत होतो की आधी आमच्य़ाशी बोलावे. दिल्लीत जेव्हा भाजपा नेत्यांना भेटायचो तेव्हा ते सांगायचे की एकत्र येऊन काम केले पाहिजे. अजित पवारांनी मला विचारले, की फडणवीस बोलण्यासाठी बोलावत आहेत. त्याला मी सांगितले की बोलण्यात काय गैर आहे, जा. यानंतर अजितने देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे मला सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू मी थोडे थांबण्यास सांगितले. भाजपाची मते जाणून घ्यायची होती. मी नंतर ऐकेन असे सांगितल्याचे पवार म्हणाले.