वाहतूक संघटना करणार आंदोलन

By admin | Published: January 25, 2017 03:19 AM2017-01-25T03:19:47+5:302017-01-25T03:19:47+5:30

केंद्र सरकारने परिवहन विभागाच्या विविध शुल्कात केलेली भरमसाठ दरवाढ मागे घ्यावी, यासाठी विविध वाहतूक संघटनांनी

The transport organization will do the movement | वाहतूक संघटना करणार आंदोलन

वाहतूक संघटना करणार आंदोलन

Next

पुणे : केंद्र सरकारने परिवहन विभागाच्या विविध शुल्कात केलेली भरमसाठ दरवाढ मागे घ्यावी, यासाठी विविध वाहतूक संघटनांनी येत्या मंगळवारी (दि. ३१) राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. परिवहन विभागातील शुल्कावाढी विरोधात मार्केटयार्ड येथील हमालनगर येथे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, बस व आरटीओ प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे वाहन शिकाऊ परवाना, वाहन नोंदणी, तंदुरुस्ती प्रमाणपत्र अशा विविध प्रकारच्या शुल्कामध्ये दुप्पट ते तीस पट वाढ झाली आहे. त्याला विविध प्रवासी व माल वाहतूक संघटनांनी विरोध केला आहे. जवळपास सर्वच वाहनांना या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The transport organization will do the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.