चार वर्षांत राज्यातील जवळपास ३ कोटी रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 06:09 AM2018-11-25T06:09:02+5:302018-11-25T06:09:04+5:30

१०८ रुग्णवाहिका ठरतेय वरदान : १० महिन्यांत सेवा घेण्यात पुणे आघाडीवर, आठ लाख गर्भवतींनाही झाला लाभ

Treatment for nearly three crore patients in the state in four years | चार वर्षांत राज्यातील जवळपास ३ कोटी रुग्णांवर उपचार

चार वर्षांत राज्यातील जवळपास ३ कोटी रुग्णांवर उपचार

googlenewsNext

- स्नेहा मोरे


मुंबई : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना सेवा देणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २६ जानेवारी २०१४ रोजी ही सेवा राज्यात सुरू झाली, तेव्हापासून गेल्या चार वर्षांत तब्बल ३ कोटी ३९ लाख ५ हजार ८६३ रुग्णांवर या सेवेच्या माध्यमातून उपचार करण्यात आले आहेत. तर गेल्या जवळपास १० महिन्यांत या सेवेचा लाभ घेण्यात पुणे हे राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.


राज्यभरात १०८ रुग्णवाहिकेची सेवा घेण्यात पुणे शहर आघाडीवर असून या जिल्ह्यात ३ लाख ४१ हजार २६३ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यानंतर सोलापूर आणि मुंबई जिल्ह्यातील रुग्णांवर उपचार करण्याचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय, गेल्या चार वर्षांत रुग्णवाहिकेने राज्यातील ८ लाख ३० हजार ४३५ गर्भवतींवर उपचार केले आहेत. तर याशिवाय, अन्य आरोग्यविषयक तक्रारींनी ग्रस्त असणाºया १६ लाख ३१ हजार ४८९ रुग्णांना नवसंजीवनी दिली आहे.


राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने ग्रामीण विशेषत: आदिवासीबहुल भागात आरोग्यविषयक सेवा-सुविधा जलदगतीने पोहोचाव्यात, या उद्देशाने ‘१०८’ रुग्णवाहिकेची संकल्पना मांडण्यात आली. या सेवेसाठी जिल्ह्यात ४६ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. राज्यभरात रात्रंदिवस या दोन सत्रांत ९३७ रुग्णवाहिका कार्यरत असून त्यातील २३३ रुग्णवाहिकांमध्ये अद्ययावत लाइफ सपोर्ट असून ७०४ रुग्णवाहिकांमध्ये बेसिक लाइफ सपोर्टची सेवा उपलब्ध आहे.

अशी चालते यंत्रणा
रुग्ण किंवा नातेवाईक वा इतरांकडून १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी विचारणा केली असता, तो क्रमांक कुठला ते शोधले जाते. त्याच वेळी जीपीएस प्रणालीने त्या मार्गावर कोणते रुग्णालय आहे, हे पाहून तेथील ग्रामीण, उपरुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधत रुग्णाविषयी कल्पना दिली जाते. तेथील १०८ वरील वाहनचालकांशी संपर्क साधत, अवघ्या १५-२० मिनिटांत रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहोचते. दरम्यान, त्यानंतर रुग्णावर त्वरित प्राथमिक उपचार सुरू होतात. गरज भासल्यास अपघातग्रस्त वा आपत्कालीन स्थितीत असलेल्या रुग्णाला रुग्णालयातही नेले जाते.

Web Title: Treatment for nearly three crore patients in the state in four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.