टाइपरायटरची टिकटिक सुरूच राहणार, संगणक टंकलेखनासोबतच मॅन्युअल टंकलेखन सुरू ठेवण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 02:51 AM2017-11-17T02:51:42+5:302017-11-17T02:52:15+5:30
राज्यातील लघुलेखन-टंकलेखन वाणिज्य संस्थांमध्ये संगणक टंकलेखनासोबतच मॅन्युअल टंकलेखन ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील लघुलेखन-टंकलेखन वाणिज्य संस्थांमध्ये संगणक टंकलेखनासोबतच मॅन्युअल टंकलेखन ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला. त्यामुळे टाईपरायटरची टिक्टिक् सुरुच राहणार आहे. या आधी मॅन्युअल टंकलेखन ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तथापि, आधी मे २०१६ पर्यंत आणि नंतर ३१ मे २०१७ पर्यंत त्यास मुदतवाढ देण्यात आली होती. टंकलेखन बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. याचिकाकर्त्यांच्या निवेदनाबाबत विचारविनिमय करून निर्णय घ्यावा असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. अभ्यासक्रम ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय आज घेतला.