फसवाफसवी करू नका...नाहीतर आम्हालाही कळतं! उदयन राजेंचा शरद पवारांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 11:47 AM2018-09-22T11:47:53+5:302018-09-22T16:57:01+5:30

राज्यात शरद पवार यांचे आजचे वय पाहता एवढा मोठा कोण नेता आहे का, आपणा सर्वांना लाजवेल अशी धावपळ ते करतात. त्यांना काय सांगणार. फसवाफसवी करू नका फक्त, नाहीतर आम्हालाही कळतं.' असा सुचक इशारा उदयन राजे यांनी दिला. 

Udayanaraje going to sit sharad Pawar's car... Deep discussion between both | फसवाफसवी करू नका...नाहीतर आम्हालाही कळतं! उदयन राजेंचा शरद पवारांना इशारा

फसवाफसवी करू नका...नाहीतर आम्हालाही कळतं! उदयन राजेंचा शरद पवारांना इशारा

Next

सातारा : आज सकाळी शरद पवार आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांच्यात 15 मिनिटे चर्चा झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. गेल्या काही काळापासून उभयतांत 'कॉलर उडविण्यापर्यंत' वक्तव्ये गेली होती. यावेळी काय चर्चा झाली याबाबतचे सांगणे उदयन राजेंनी टाळले असले तरीही सूचक विधान केले आहे.


गेल्या काही काळापासून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये काही प्रमाणात वितुष्ट निर्माण झाले होते. शरद पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर असताना उदयन राजे सोडून इरत सर्वांनी पवार यांची भेट घेतली होती. यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष साताऱ्यावर केंद्रीत झाले होते. आज उदयन राजेंनी पवार यांनी भेट घेतली. 


यावेळी जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली. याबाबत उदयन राजेंना विचारले असता त्यांनी पवार यांनी आपल्याला कडकडून मिठी मारल्याचे सांगितले. 'तुम्ही आमचेच आहात. नंतर बोलू. मी पण सांगितलं. कसं आहे, राज्यात शरद पवार यांचे आजचे वय पाहता एवढा मोठा कोण नेता आहे का, आपणा सर्वांना लाजवेल अशी धावपळ ते करतात. त्यांना काय सांगणार. फसवाफसवी करू नका फक्त, नाहीतर आम्हालाही कळतं.' असा सुचक इशारा उदयन राजे यांनी दिला. 

गाडीत बसण्यास गेले अन्...
चर्चेतून बाहेर पडताना उदयन राजेंनी चुकुन शरद पवार यांच्या गाडीचा दरवाजा उघडला. मात्र, चालकाकडे पाहून त्यांना ही आपली गाडी नसून पवार साहेबांची असल्याचे कळताच माघारी परतले. यावेळी उपस्थितांत एकच हशा पिकला. मात्र, उदयन राजेंनी 'साहेबांची गाडी आहे. एवढं काय...कलर एकच आहे. वाटले आपली गाडी.' असे म्हणत वेळ मारून नेली. 

शरद पवार यांनी दोन वर्षांपूर्वी साताऱ्याच्या दोन्ही राजांदरम्यान असलेला विसंवाद दूर करण्यासाठी पुण्यात समेट घडवून आणला होता. यावेळी दोन्ही राजांनी पवार यांच्या गाडीचे सारथ्य केले होते. मात्र, ही शिष्टाई यशस्वी झाल्याचे वाटत असतानाच पुन्हा वर्चस्व वादाने उसळी घेतली व साताऱ्याचे राजकारण पुन्हा तापू लागले आहे. 

Web Title: Udayanaraje going to sit sharad Pawar's car... Deep discussion between both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.