विविध दुर्घटनांमध्ये राज्यात १३ जणांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 03:09 AM2017-09-25T03:09:38+5:302017-09-25T03:09:47+5:30
राज्यात शनिवार व रविवारी विविध दुर्घटनामंध्ये बुडून १३ जणांचा मृत्यू झाला. मराठवाड्यात पाच मुली बुडाल्या. तर..
मुंबई : राज्यात शनिवार व रविवारी विविध दुर्घटनामंध्ये बुडून १३ जणांचा मृत्यू झाला. मराठवाड्यात पाच मुली बुडाल्या. सांगली जिल्ह्यात शनिवारी दोन बहिणी शेततळ््यात पाय घसरून पडल्या. अमरावती जिल्ह्यात बंधा-यात पोहण्यासाठी गेलेले तिघे बुडाले. नंदुरबारमध्ये तरुण नदीत बुडाला. पुणे जिल्ह्यात खड्ड्यातील पाण्यात पडलेल्या दोघा चुलत भावांचा मृत्यू झाला.
जालना जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच मुलींचा बुडून मृत्यू झाला. त्यात चार सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. या मुली ६ ते १४ वयोगटांतील आहेत. सांगली जिल्ह्यात शेततळ्यात बुडून दोन बहिणींचा शनिवारी मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यात बंधाºयात पोहण्यासाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बडून मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही दुर्घटना उघडकीस आली. तिघेही शनिवारपासून बेपत्ता होते. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यात आंघोळीसाठी नदीवर गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात सात वर्षांच्या दोन चुलत भावांचा खड्ड्यातील पाण्यात पडून शनिवारी मृत्यू झाला.