मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू अचानक रजेवर, गैरहजेरीत देवानंद शिंदे सांभाळणार पदभार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 06:05 PM2017-08-09T18:05:53+5:302017-08-09T18:18:23+5:30

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू अचानक रजेवर गेल्यानं अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

Vice Chancellor of Mumbai University suddenly leave | मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू अचानक रजेवर, गैरहजेरीत देवानंद शिंदे सांभाळणार पदभार

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू अचानक रजेवर, गैरहजेरीत देवानंद शिंदे सांभाळणार पदभार

मुंबई, दि. 9 - मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू अचानक रजेवर गेल्यानं अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. विद्यापीठाचे निकाल प्रलंबित असतानाही कुलगुरूच रजेवर गेल्यानं मोठा सावळागोंधळ उडाला आहे. कुलगुरू देशमुख यांच्या अनुपस्थितीत देवानंद शिंदे त्यांचा पदभार सांभाळणार आहेत. कुलगुरू देशमुखांनी राज्यपालांकडे रजेसाठी अर्ज केला होता. त्यानुसारच ते रजेवर गेल्याचं बोललं जातंय. मात्र त्यांना राजभवनाकडूनच सक्तीच्या रजेवर पाठवल्याची चर्चा आहे. तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मुंबई विद्यापीठाचे परीक्षा प्रभारी म्हणून व्हीजेटीआयचे संचालक धिरेन पटेल यांची नियुक्ती केली आहे. मार्च आणि एप्रिलमधल्या परीक्षासंदर्भातील कामकाज धिरेन पटेल पाहणार आहेत.

मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिलेली 31 जुलैची पहिली डेडलाइन चुकल्यानंतर विद्यापीठाच्या कारभारावर सर्व बाजूंनी टीका केली जातेय. 5 ऑगस्टची दिलेली दुसरी डेडलाइनही विद्यापीठाला पाळता आलेली नाही. 212 अभ्यासक्रमांचे निकाल अद्यापही जाहीर झालेले नाहीत.

यंदा एप्रिल महिन्यात कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, निविदा प्रक्रिया सुरू केली. मात्र, त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळूनही ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणी सुरू केली. त्यामध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे ऑगस्ट महिना उजाडूनही उत्तरपत्रिकांची तपासणी सुरूच आहे. मुंबई विद्यापीठाला सर्व 477 अभ्यासक्रमांचे निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्याचे आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी 4 जुलै रोजी दिले होते, पण विद्यापीठाने ही डेडलाइन पाळली नाही. त्यानंतर विद्यापीठाला पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. पण ही डेडलाइनही विद्यापीठ पाळू शकलेले नाह

15 ऑगस्टला निकाल लागणार?
मुंबई विद्यापीठाने स्वत:हून 15 ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर होतील, असे स्पष्ट केले होते, पण आता विद्यापीठ स्वत:ची डेडलाइन तरी पाळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

   

Web Title: Vice Chancellor of Mumbai University suddenly leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.