VIDEO : सांगलीतील चौंडेश्वरी देवीचा भावई उत्सवाचा जल्लोष
By Admin | Published: June 23, 2017 12:43 PM2017-06-23T12:43:53+5:302017-06-23T16:32:56+5:30
ऑनलाइन लोकमत सांगली, दि. 23- आष्टा येथील श्री चौंडेश्वरी देवीचा भावई उत्सवात शुक्रवारी देवीने जोगणी रूपात दैत्याचा शोध घेतला. ...
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 23- आष्टा येथील श्री चौंडेश्वरी देवीचा भावई उत्सवात शुक्रवारी देवीने जोगणी रूपात दैत्याचा शोध घेतला. भावईतील हा प्रमुख खेळ पाहण्यास व जोगणी रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
कर्नाटकातील बदामी येथील भावई उत्सव आष्ट्यात पारंपरिक पद्धतीने खेळला जातो. बारा बलुतेदार, खेळगडी, मानकरी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. देवीने चंडिका अवतार घेऊन प्रजेस त्रास देणाऱ्या चंड-मुंड राक्षसाचा वध केला होता.
त्यावेळी राक्षसाने विविध रूपे घेतली होती. तशीच रूपे देवीनेही घेतली होती. आळूमुळू, पिसे या दैत्य रूपानंतर देवीने जोगणी रूप घेऊन ती सहकाऱ्यांसह दैत्याच्या शोधासाठी बाहेर पडली होती, अशी आख्यायिका आहे.
त्यानुसार येथेही त्या युद्धाचा खेळ खेळला जातो. एक दमामे पाटील व दोन सुतार जोगणी मंदिरातून तर चौथी कुंभार जोगणी कुंभार वाड्यातून रंगून यामध्ये सामील झाली. पारंपरिक पोशाख जोगणी होत्या. या जोगण्यांची प्रमुख मानकऱ्यांच्या घरी पूजा होते. जोगण्यांपुढे रणशिंग, संबळ, चौंडके, कैताळ अशी वाद्ये लयीत वाजवली जातात. नगारे, छत्री, वाद्ये यासर्व लवाजमा प्रमुख मार्गावरून जातो. यावेळी भाविक दर्शन घेतात.
प्रथम पूजेचा मान मातंग समाजाचा असून त्यानंतर परीट, थोरात, पाटील, कुलकर्णी, महाजन यांच्या पूजा घेतल्या जातात. यावेळी लयीत वाद्य वाजवीत गाणी म्हणतात. पहाटे मंदिरातून निघाल्यानंतर दुपारी जोगण्या मंदिरात जातात.
https://www.dailymotion.com/video/x84566g