VIDEO: रत्नागिरीत होळीच्या सणाला गालबोट, साकव कोसळून पाच गंभीर
By Admin | Published: March 13, 2017 01:04 PM2017-03-13T13:04:23+5:302017-03-13T15:53:26+5:30
ऑनलाइन लोकमत रत्नागिरी, दि. 13 - संगमेश्वरमध्ये होळीच्या सणाला गालबोट लागलं आहे. कळंबुशीमध्ये होळीचे माड नेत असताना अचानक 35 ...
ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. 13 - संगमेश्वरमध्ये होळीच्या सणाला गालबोट लागलं आहे. कळंबुशीमध्ये होळीचे माड नेत असताना अचानक 35 वर्षं जुना साकव कोसळला असून, दुर्घटनेत 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. तर पाच जण गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
संगमेश्वरच्या कळंबुशी-खाचरवाडी येथे गावकरी देवीचा माड घेऊन जात असतानाच अचानक त्यांच्यावर काळानं घाला घातला. कळंबुशीतील होळीसाठी अन्य गावातील गावकरीही मोठ्या संख्येनं हजेरी लावतात. हा साकव 35 वर्षांहून फार जुना असून, क्षमतेपेक्षा जास्त माणसं एकाच वेळी गेल्यानं हा साकव कोसळला आहे.
विशेष म्हणजे साकवाखालची नदी कोरडी असल्यानं मोठा अनर्थ टळला. साकवावर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. खांद्यावर होळी असल्यानं अनेक जण दबले गेले. मात्र स्थानिकांनी तातडीनं बचावकार्य राबवत सर्व गावक-यांना बाहेर काढले. साकव कोसळतानाचं चित्र कॅमे-यात कैद झालं आहे.
https://www.dailymotion.com/video/x844u0q