दापोली कोकण कृषी विद्यापीठाचा विद्यार्थी बनला गोव्याचा कृषीमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 12:45 PM2017-10-03T12:45:29+5:302017-10-03T12:46:01+5:30
आपण मंत्री बनूनच या महाविद्यालयात येणार असा पण या विद्यार्थ्याने केला होता. त्या काळी या महाविद्यालयात विद्यार्थी चळवळीमध्येही हा विद्यार्थी सक्रीय होता.
पणजी : दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात तब्बल २७ वर्षांपूर्वी शिक्षण घेणा-या गोव्याच्या एका विद्यार्थ्याने आपण मंत्री बनूनच या महाविद्यालयात येणार असा पण केला होता. त्या काळी या महाविद्यालयात विद्यार्थी चळवळीमध्येही हा विद्यार्थी सक्रीय होता. कालांतराने बीएससी इन अॅग्रीकल्चर ही पदवी त्याने घेतली. हा विद्यार्थी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई होत.
१९८९ च्या सुमारास विजय यांना त्यांच्या वडिलांनी कृषी शिक्षणासाठी दापोलीला पाठवले. गोव्यात त्या काळीही कृषी अभ्यासक्रमाची सोय नव्हती. सरदेसाई म्हणतात की, ‘मनाविरुध्द मी कृषी शिक्षणासाठी गेलो होतो’. घरात राजकारणाचा वारसा नसला तरी विजय यांचा पिंड राजकारण्याचा. दापोलीच्या विद्यापीठात त्यांनी त्या काळी विद्यार्थी संघटनेसाठीही राजकारण केले.
आज गोव्यातील १७ विद्यार्थी दापोली विद्यापीठात कृषी शिक्षण घेत आहेत. या स्मृतींना उजाळा देताना सरदेसाई आजही काही गोष्टींचा आवर्जुन उल्लेख करतात.