महाबळेश्वरात विक्रम ४१४ मिमी पाऊस; कोकण, मध्य महाराष्ट्रात पूरस्थिती

By admin | Published: August 4, 2016 05:46 AM2016-08-04T05:46:20+5:302016-08-04T05:46:20+5:30

कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कायम असून, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली

Vikrama 414 mm rain in Mahabaleshwar; Flooding in Konkan, Central Maharashtra | महाबळेश्वरात विक्रम ४१४ मिमी पाऊस; कोकण, मध्य महाराष्ट्रात पूरस्थिती

महाबळेश्वरात विक्रम ४१४ मिमी पाऊस; कोकण, मध्य महाराष्ट्रात पूरस्थिती

Next


सातारा- कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कायम असून, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत महाबळेश्वर येथे तब्बल ४१४ मिमी एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली. मराठवाडा, विदर्भातही काही ठिकाणी दमदार पाऊस झाला.येत्या २४ तासांत कोकणसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या धुवाधार पावसामुळे गोदावरीला आलेल्या महापुरात अडकलेल्या १६ जणांना बचाव पथकाच्या जवानांनी बाहेर काढले.

Web Title: Vikrama 414 mm rain in Mahabaleshwar; Flooding in Konkan, Central Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.