रस्ता दुुरुस्तीप्रकरणी ग्रामस्थांनी मतदानावर टाकला बहिष्कार

By Admin | Published: February 21, 2017 08:40 PM2017-02-21T20:40:46+5:302017-02-21T20:40:46+5:30

ढवळी (ता. मिरज) येथील ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्तीसाठी मतदानावरील बहिष्कार कायम ठेवल्याने मतदान केंद्रावर दिवसभर शुकशुकाट होता.

Village boycott boycotted voter turnout | रस्ता दुुरुस्तीप्रकरणी ग्रामस्थांनी मतदानावर टाकला बहिष्कार

रस्ता दुुरुस्तीप्रकरणी ग्रामस्थांनी मतदानावर टाकला बहिष्कार

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
नरवाड : ढवळी (ता. मिरज) येथील ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्तीसाठी मतदानावरील बहिष्कार कायम ठेवल्याने मतदान केंद्रावर दिवसभर शुकशुकाट होता. ढवळी गाव समडोळी जिल्हा परिषद गटात येते. मात्र मंगळवारी (दि. २१) ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने मतदान केंद्रावर दिवसभर स्मशानशांतता होती. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत तीन मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती.

यासाठी प्रत्येकी सात कर्मचारी मिळून पोलिस कर्मचाऱ्यांसह २१ कर्मचारी कार्यरत होते. ढवळीत २४४४ मतदार असून, मंगळवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी केवळ चौघांचे मतदान झाले. गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांनी ग्रामस्थांना
मतदानाचे आवाहन केले. मात्र ममतदारांनी रस्ता दुरुस्तीच्या निर्णयावर ठाम राहून मतदान केले नाही. मतदानादिवशी गाव पूर्णपणे बंद ठेवल्याने उपस्थित मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची पंचाईत झाली. महसूल विभागाला ढवळीच्या वाळू उपशापोटी वर्षाला सात कोटी रुपये महसूल प्राप्त होतो. मात्र वड्डी ते ढवळी हा चार किलोमीटरचा रस्ता दुरूस्त करण्यास शासन टाळाटाळ करीत आहे.

त्यामुळे २ आॅक्टोबररोजी ग्रामसभेत सरपंच सौ. अश्विनी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्ता दुरूस्तीच्या कारणास्तव मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला ग्रामस्थांनीही मंजुरी दिल्याने बहिष्काराचा निर्णय कायम ठेवण्यात आला.
३० डिसेंबररोजी ढवळीच्या ग्रामस्थांनी मिरज-बेळगाव रास्ता रोको केला होता. मात्र त्याचाही परिणाम शासनावर झाला नसल्याने अखेर मंगळवारी नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला.

Web Title: Village boycott boycotted voter turnout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.