ऐन हिवाळ्यात आणीबाणी; लातूरकरांना 10 दिवसांआड मिळणार पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 11:07 AM2018-12-18T11:07:21+5:302018-12-18T11:07:28+5:30

अपुऱ्या पावासामुळे लातूरमध्ये भीषण पाणी टंचाई

water crisis in latur city will get water once in a 10 days | ऐन हिवाळ्यात आणीबाणी; लातूरकरांना 10 दिवसांआड मिळणार पाणी

ऐन हिवाळ्यात आणीबाणी; लातूरकरांना 10 दिवसांआड मिळणार पाणी

Next

लातूर: ऐन हिवाळ्यात लातूरमध्ये पाणी प्रश्नानं गंभीर स्वरुप धारण केलं आहे. अपुऱ्या पावसामुळे लातूरमधील पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनानं लातूर शहराला 10 दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लातूरकरांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार आहे. 

अपुऱ्या पावसामुळे लातूरमध्ये ऐन हिवाळ्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अद्याप उन्हाळ्याचे दिवस शिल्लक असल्यानं पाणी टंचाईच्या झळा आणखी दाहक होणार आहेत. त्यामुळेच महापालिका आयुक्तांनी दर 10 दिवसांनी शहराला पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पाणी गळतीची समस्या कमी करण्यासाठीदेखील विशेष पावलं उचलण्यात येणार आहेत. 2016 मध्येही लातूरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यावेळी या भागात ट्रेननं पाणी पुरवठा करण्यात आला होता. 

काही दिवसांपूर्वी लातूरच्या पाणी पुरवठ्याबद्दल स्थानिक खासदार सुनिल गायकवाड यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी आम्ही लातूरला विमानानंदेखील पाणी पुरवठा करू शकतो, असं विधान केलं होतं. '2016 मध्ये आम्ही रेल्वेनं लातूरला पाणी पुरवठा केला होता. आता आम्ही विमानानंदेखील लातूरमध्ये पाणी आणू शकतो. मात्र ती वेळ येणार नाही,' असं गायकवाड म्हणाले होते. 
 

Web Title: water crisis in latur city will get water once in a 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.