बाजारू सदाभाऊंना पुढच्यावेळी बघून घेऊ; राजू शेट्टी शेट्टींची घणाघाती टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 10:11 PM2017-08-26T22:11:13+5:302017-08-26T22:17:50+5:30

बाजारू सदाभाऊंना पुढच्यावेळी बघून घेऊ अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

We look forward to the market; Raju Shetty's scathing critique of Shetty | बाजारू सदाभाऊंना पुढच्यावेळी बघून घेऊ; राजू शेट्टी शेट्टींची घणाघाती टीका

बाजारू सदाभाऊंना पुढच्यावेळी बघून घेऊ; राजू शेट्टी शेट्टींची घणाघाती टीका

googlenewsNext
ठळक मुद्देबाजारू सदाभाऊंना पुढच्यावेळी बघून घेऊ अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरणे, हे काम आपलं आहे, या भावनेने स्वाभीमानीची वाटचाल सुरु आहे.

इस्लामपूर, दि. 26- स्वाभिमानी शेतकरी संघटना ही पॅसेंजर रेल्वे आहे. या पॅसेंजरमध्ये अनेकजण चढले, अनेकजण उतरले. मात्र रेल्वे ही पुढेच जात आहे. या गाडीचा मी ड्रायव्हर असून ज्यांनी आमचा विचार सोडला ती एकाकी पडली आहेत, स्वाभिमानीचा अजेंडा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राखणे हा नसून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यास भाग पाडणे हा आहे, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी मंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता लगावला. 

इस्लामपूर येथे आयोजित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. खासदार शेट्टी म्हणाले, "राजकारणातील उंची वाढावी, काही मिळावं, बदल्यांची दुकानदारी चालावी, ठेका मिळावा म्हणून राजकरणात उतरलेलो नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरणे, हे काम आपलं आहे, या भावनेने स्वाभीमानीची वाटचाल सुरु आहे. प्रसंगी शेतकऱ्याचे हित साध्य होत नसेल तर हातात उसाचा बुडखा घेणं हे काम आमचे आहे. 

सदाभाऊंचे नाव न घेता ते म्हणाले, "चांगले दिवस आले आहेत असे समजून आम्ही आमच्यातील एकाला दिवाळीच्या मालाची यादी काढून बाजारात पाठवला. तो बहाद्दर बाजार करण्यासाठी म्हणून आमच्या घरातून बाहेर पडला, गेला तो तिकडेच गेला. परत आला नाही. तेथूनच फोन करुन आम्हाला सांगत आहे, मी आता बाजारातच राहणार आहे, एवढ्यावर न थांबता, आमच्यातीलच काही लोकांना पैसे देतो, माझ्याकडे या असे म्हणून बोलवू लागलाय. मात्र त्याने लक्षात ठेवावे, एक दिवाळी वाया गेली म्हणून काय, पुढच्या दिवाळीला बघून घेऊ. मात्र आता तुमचे पुढे काय? याचा विचार करावा.'' 

केंद्र सरकार बाबत ते म्हणाले," भाजपवाले स्वतःला रामाचे अनुयायी म्हणून सांगतात. त्यांनी रामाचा एक तरी गुण घ्यावा. आम्हाला निवडून आल्यावर उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देतो असे आश्‍वासन दिलं होतं, ते कसं काय विसरताय. मोदींनी आम्हाला खोटं आश्‍वासन दिलं असे तरी सांगावे किंवा मोदींना शेतीतील काही कळत नसल्यामुळे त्यांनी असे आश्‍वासन दिले असे तरी सांगावे. 20 नोव्हेंबरला सातबारा कोरा करा नाही तर लाल किल्ल्यावरुन भाषण द्यायचे बंद करा हे सांगण्यासाठी देशातील 10 लाख शेतकरी दिल्लीला जाणार आहेत. सर्वांनी दिल्लील जायचय हे लक्षात ठेवावे आणि देत नसले तर नरड्यावर पाय ठेवून घ्यायचे आहे अशी मानसिकता ठेवावी. मी आता खासदार राहिलो नाही तरी काही फरक पडत नाही. मात्र शेतकऱ्यांचा घेतलेला वसा टाकणार नाही.'' 

शिवसेनेतून स्वगृही परतलेले सयाजी मोरे म्हणाले, " माझा वाद खासदार राजू शेट्टींच्या बरोबर नव्हता तर त्यांच्या बडव्याबरोबर होता. तो बडवा अडचणीत असताना राजू शेट्टींनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. ताटातील घास भरवला. त्याला आमदार केले, त्याला मंत्री केले, त्याने आता राजू शेट्टींच्या विरोधात जातीयवादी खासदार म्हणून प्रचार सुरु केला आहे. आज तुम्ही मराठा समाजाचे नाव घेवून बदनाम करता तर सदाभाऊ खोत तुम्हीच हातकणंगले मतदारसंघात निवडणूक लढवून दाखवा.'' 

स्वाभीमानीचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, वाळवा तालुकाध्यक्ष जयवंत पाटील, भागवत जाधव, आप्पासाहेब पाटील, मकरंद करळे, ऍड्‌. शमशुद्दीन संदे, संदीप राजोबा, शहाजी पाटील, महेश खराडे, तानाजी साठे, ऍड्‌. एच. आर. पाटील, संदीप नलवडे, प्रमुख उपस्थित होते.

Web Title: We look forward to the market; Raju Shetty's scathing critique of Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.