हवामान विभाग करणार भिरा तापमानाचा अभ्यास

By admin | Published: March 31, 2017 04:12 AM2017-03-31T04:12:25+5:302017-03-31T04:12:25+5:30

मंगळवारी देशातील सर्वाधिक कमाल ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेल्या माणगाव तालुक्यांतील

The Weather Department will study the temperature of the hill | हवामान विभाग करणार भिरा तापमानाचा अभ्यास

हवामान विभाग करणार भिरा तापमानाचा अभ्यास

Next

अलिबाग : मंगळवारी देशातील सर्वाधिक कमाल ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेल्या माणगाव तालुक्यांतील भिरा येथे भारतीय हवामान विभागाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या चमूने शुक्रवारी प्रत्यक्ष भेट दिली. येथील निरीक्षणे घेऊन या विक्रमी तापमानाबाबत अभ्यास करणार असल्याची माहिती माणगावच्या तहसीलदार ऊर्मिला पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. त्यांच्या निरीक्षण व अभ्यासानंतर याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
मंगळवारी माणगावच्या तहसीलदार ऊर्मिला पाटील यांनी भिरा येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. भारतीय हवामान विभागाचे हे तापमापक भिरा येथील धरण प्रकल्पाच्या प्रयोगशाळेत ठेवले आहे. ४६.५ अंश सेल्सिअस हे तेथील तापमान असह्य होते, असे पाटील यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: The Weather Department will study the temperature of the hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.