जैन इरिगेशनचे कार्य मानव हिताचे: सी. विद्यासागर राव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 03:06 AM2017-12-21T03:06:16+5:302017-12-21T03:06:56+5:30
संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टीमुळे जैन इरिगेशनने कृषिक्षेत्रात केलेले कार्य मोलाचे व अद्वितीय आहे. भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टीला दाद द्यायला हवी, कारण ही संस्था त्यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी निर्माण केली आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे काढले.
जळगाव : संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टीमुळे जैन इरिगेशनने कृषिक्षेत्रात केलेले कार्य मोलाचे व अद्वितीय आहे. भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टीला दाद द्यायला हवी, कारण ही संस्था त्यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी निर्माण केली आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे काढले.
राज्यपालांनी बुधवारी जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांना भेटी देऊन त्यांच्या कामांचे कौतुक केले. जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य दलुभाऊ जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, अभय जैन, अथांग जैन तसेच विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर आदी उपस्थित होते.
सी. विद्यासागर राव यांनी भवरलाल जैन यांनी उभारलेल्या पहिल्या जलसंधारण प्रकल्पासह त्यांचे स्मृतिस्थळ, जगातील सर्वात मोठ्या टिश्युकल्चर उत्पादन केंद्रासही त्यांनी भेट दिली. डाळिंब, अतिघन फळ झाड लागवडीचे प्रयोग तसेच उच्च तंत्राने भाजीपाला लागवड प्रात्यक्षिक केंद्र आणि आंबा, संत्रा, संशोधन व विकास केंद्र आणि जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेची माहिती घेतली. ‘पाणी विद्यापीठ’ उभारणार असलेल्या जागेची त्यांनी पाहणी केली. ‘गांधीतीर्थ’ येथे राज्यपाल बराच वेळ रमले.
आदिवासी अकादमीच्या कामांवर लक्ष केंद्रित करा
चाळीसगाव येथे उभारण्यात येणाºया भास्कराचार्य गणितीय नगरी, तसेच नंदुरबार येथे उभारण्यात येणाºया आदिवासी अकादमीच्या कामाकडे अधिक लक्ष देऊन त्यांना गती द्या. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून देण्याबाबत उपाययोजना करा, अशा सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विभागीय आयुक्त महेश झगडे तसेच जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना दिल्या. राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत उपलब्ध निधीमधून जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आॅनलाइन परीक्षा केंद्र उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते बुधवारी सकाळी झाले.